Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पत्रकारांनी आपले व आपल्या कुटुंबीयांचे आरोग्य जोपासावे - वैद्यकीय अधिक्षक डॉ.देवेंद्र लाडे आरोग्य तपासणी शिबिर #Health Camp

पत्रकारांनी आपले व आपल्या कुटुंबीयांचे आरोग्य जोपासावे - वैद्यकीय अधिक्षक डॉ.देवेंद्र लाडे
आरोग्य तपासणी शिबिर

मूल प्रतिनिधी

वृत्तपत्र हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहे.या चौथ्या स्तंभामध्ये काम करणा-या पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. केवळ आपलीच नव्हे तर, आपल्या कुटुंबीयांचे सुदधा आरोग्य जोपासले पाहिजे असे प्रतिपादन मूल येथील उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.देवेंद्र लाडे यांनी केले. मूल तालुका पत्रकार संघ ,मूल आणि उपजिल्हा रूग्णालय,मूल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी शुक्रवारी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मूल येथील पत्रकार भवनात आयोजित या आरोग्य तपासणी शिबिरात पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबीयांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला. प्रमूख अतिथी म्हणून हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ सल्लागार चिकित्सक डायबेटिक केअर युनिटचे डॉ.अमित ढवस,डॉ.अविष्कार खंडारे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.थेरे,डॉ.तिरथ उराडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.मनिषा रेवतकर,दंतचिकित्सक डॉ.सविता मेंडूले,मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम यांची उपस्थिती होती.
धावपळीच्या जीवनामध्ये आणि वृत्तपत्राच्या माध्यमामध्ये काम करीत असताना पत्रकारांचे जीवन सदैव व्यस्त राहत असल्याने त्याचे आपल्या आरोग्या कडे दुर्लक्ष होते.प्रसंगी त्याला कालांतराने विविध व्याधींना सामोरे जावे लागते.अशा व्यस्त कार्यक्रमातून मार्ग काढून आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी असे आरोग्य तपासणी शिबिर पत्रकारांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी फायदेशिर ठरू शकतात असे मत डॉ.देवेंद्र लाडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तंबाखूजन्य पदार्थ आणि खर्रा खाण्याच्या सवयी मुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे.महाराष्टात चद्रपूर जिल्हा अशा रोगासाठी प्रथम क्रमांकावर आहे.तरूणांनी व्यसनांपासून दूर राहून सुदृढतेवर भर दयावा  असे मत दंतरोग चिकित्सक डॉ. सविता मेंडूले यांनी  मांडले .यावेळी डॉ.ढवस,डॉ.उराडे,डॉ.खंडारे,तालुका वैद्यकीय अधिकारी  डॉ.थेरे यांनी आपले मनोगत सादर केले.प्रथमता वैद्यकीय अधिका-यांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. शिबिर घेण्यामागची भूमिका प्रास्ताविकातून मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम यांनी मांडली.
आरोग्य तपासणी शिबिराला पत्रकार व कुटुंबीयांचा उत्स्फुर्त सहभाग मिळाला.यावेळी जवळपास तीस सदस्यांची ईसिजी,दंत,नेत्र,एचआयव्ही,बीपी, शुगर,कोलेस्टाल,सिकलसेल,इतर रक्त तपासणी तसेच जनरल तपासणी करण्यात आली.यावेळी उपजिल्हा रूग्णालयातील प्रयोगशाळा विभाग,आसीटीसी विभाग,फिजीशियन विभाग,एनसीडी,स्त्रीरोग,ईजिसी,बालरोग, जनरल फिजीशियन आणि औषधी विभाग कार्यरत होता.तपासणी नंतर आवश्यक सदस्यांना औषधी वितरीत करण्यात आली. वैद्यकीय अधिक्षक डॉ.लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी,विभाग प्रमुख  आणि कर्मचारी वर्गांनी उत्तम सेवा दिली.शिबिर कार्यक्रमाचे संचालन मूल तालुका पत्रकार संघाचे सचिव विनायक रेकलवार यांनी तर आभार उपाध्यक्ष युवराज चावरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मूल तालुका पत्रकार संघाचे सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments