Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जुनासुर्ला येथे जीवघेणा खड्डा, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष #Fatal pothole at Junasurla, neglect of construction department no

जुनासुर्ला येथे जीवघेणा खड्डा, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील जूनासूर्ला येथील मुख्य मार्गालगत बस स्थानका जवळ बांधकाम विभागांतर्गत मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. हा खड्डा आता जुनासुर्ला वासियान करिता आणि शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता जिवघेणा खड्डा ठरत आहे.

दोन ते तीन वर्षापासून खेडी ते गोंडपिपरी मुख्यमार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. सध्यासथितीत काम बंद अवस्थेत आहे. याच खेडी गोंडपिंपरी मार्गावर जुनासुर्ला गाव आहे. गावात मुख्य रस्त्यालगत
दोन महिन्यापासून 10 फुट खोल असा खडा खोदकाम करून आहे, त्यात शाळेतील विद्यार्थी पडल्याची नुकतीच घटना घडली आहे. ये-जा करीता वाटसरुना, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याविषयी गोंडपिपरी बांधकाम विभागाचे अभियंता वैद्य आणि तांगडे यांना दूरध्वनी वरून माहिती देण्यात आली. मात्र त्यांनी संबंधित ठेकेदार यांना विचारून सागतो असे मोघम उत्तर दिल्याचे जुनासुर्ला येथिल सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गणेश खोब्रागडे यांनी मूल Live शी बोलताना सांगितले.

आठ दिवसांत काम पूर्ण न केल्यास आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे गणेश खोब्रागडे यांनी गोंडपिपरी चे बांधकाम विभागाला कळविले आहे.

Post a Comment

0 Comments