Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद #Competitive examination and personality development workshop

मूल येथे स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Competitive examination and personality development workshop held at Mool, enthusiastic response from students

मूल प्रतिनिधी

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय मुल येथे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास या विषयांवर सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

उदघाटन बलारपूर नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष तसेच डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे केंद्रीय सचिव हरिशजी शर्मा यांनी केले. कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी वाचनालय मुल चे अध्यक्ष अजय गोगुलवार होते, प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे , डॉ. किरण कापगते, मुख्याध्यापिका सुनीता बुटे यांची उपस्थिती होती.

उदघाटनिय सत्रात हरिशजी शर्मा, ओमप्रकाश संग्रामे, डॉ. किरण कापगते यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रवीण मोहूर्ले यांनी केले

कार्यशाळेचे प्रथम सत्रात नागपूर विज्ञान संस्थेच्या वर्ग 1 अधिकारी प्रा. मनीषा भडंग यांनी 10 वी, 12 वी नंतरच्या वेगवेगळ्या कोर्सेस बद्दल,स्पर्धा परीक्षांच्या बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास या विषयावर गडचिरोली येथील डॉ.राकेश चडगुलवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन वाचनालयातील विद्यार्थी आत्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर कापगते, प्रवीण मोहूर्ले, संजय मारकवार, प्रमोद कोकुलवार, प्रवीण मोहूर्ले चिमढा, प्रणिता हेडाऊ तसेच जलतरण संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments