Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना " स्थापन, उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते लोकार्पण

मूल येथे "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना " स्थापन, उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते  लोकार्पण 

Establishment of "Hinduhridayamrat Balasaheb Thackeray Aap Dawakhana" at Mool, inaugurated by Chief Minister Eknath Shinde tomorrow

मूल प्रतिनिधी

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे "हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" केंद्र स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

त्या निर्देशाचा अनुषंगाने आरोग्य विभाग जिल्हा परिषद, चंद्रपुर व तालुका आरोग्य अधिकारी मुल यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका आरोग्य अधिकारी मुल अंतर्गत ताडाळा रोड, एल्गार ऑफीस च्या बाजुला वार्ड नं ११ येथे हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तालुकास्तरीय लोकापर्ण 1 मे,  रोज सोमवारला सकाळी 10  वाजता ना. एकनाथजी शिन्दे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते ऑनलाईन डिजीटल प्रणालीद्वारे लोकार्पण करून सुरु करण्यात येत आहे. करीता सदर कार्यक्रमास समस्त जनतेने उपस्थित राहावे ही विनंती. मुल भागातील जन सामान्य, गोरगरीब, झोपडपट्टीत भागात राहणा-या नागरीकांसाठी १५ वा वित आयोग अंतर्गत येथील जनतेला गावातच आरोग्य सुविधा मिळावी, या उद्देशाने सदर आपला दवाखाना सुरु करण्यात येत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रावर मिळणा-या आरोग्य सेवाप्रमाणेच (काही सेवा वगळता) सुविधा देण्यात येतील, जसे रोगनिदान व उपचार, गरोदर माता व बालक तपासणी, बालकांचे लसिकरण, संशयित क्षयरोग व कुष्ठरोग तपासणी, रक्त नमुणे घेणे इत्यादी सेवा पुरविण्यात येतील.

करीता समस्त जनतेनी हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या मध्ये येऊन आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा असे आव्हान अजय पाटणकर मुख्याधिकारी, नगरपरिषद मुल तसेच डॉ.समिर थेरे, तालुका आरोग्य अधिकारी, मूल व डॉ. देवेंद्र लाडे, वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय मूल यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments