Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल मध्ये कॉंग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडीचा विजय, रावत पॅनल ने मारली बाजी

मूल मध्ये कॉंग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडीचा विजय, रावत पॅनल ने मारली बाजी 

मूल प्रतिनिधी

मूल येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडीचा मोठा विजय झाला. या निवडणुकीत शेतकरी महाविकास आघाडीचा पराभव झाला. ही निवडणुक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण गटातुन राकेश रत्नावार, घनश्याम येनुरकर, राजेंद्र कन्नमवार,अखिल गांगरेड्डीवार,सुनिल  गुज्जनवार,किशोर घडसे, हसन वाढई विजय झाले.सेवा सहकारी मतदार संघ महिला राखीव गटातुन चंदा विनोद कामडी आणि उषा योगेश शेरकी इतर मागासवर्गिय गटातुन सुमित आरेकर,विजा,भज व विमाप्र गटातुन संदिप कारमवार विजयी झाले. ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटातुन राहुल मुरकुटे आणि लहुजी कडस्कर, अनुसुचित जाती, जमाती गटातुन शालिक दहिवले आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातुन जालिंदर बांगरे विजया झाले. तसेच अडते—व्यापारी गटातुन अमोल बच्चुवार आणि तुलाराम घोगरे विजयी झाले. तसेच ​हमाल—मापारी गटातुन रमेश बर्डे हे या आधीच बिनविरोध निवडुन आले होते. निकालानंतर तहसिल कार्यालया परीसरात विजयी उमेदवारांची रॅली काढण्यात आली. यावेळी विजयी  जल्लोष करण्यात आला.

प्रतिक्रिया
संतोष रावत 

कॉंग्रेसच्या दुस—या गटाने विरोध केला नसता तर मूल मध्ये कॉंग्रेसचे 18 ही संचालक अविरोध निवडून आले असते आणि मूल उत्पन्न कृषी बाजार समितीचा राज्यात इतिहास घडला असता.
मूल बाजार समिती शेतक—यांच्या हितासाठी अधिक चांगली बनवू.त्यासाठी आम्ही आमच्या जाहिरनाम्यात संकल्प सादर केलेला आहे.  


विजयी उमेदवारांना मिळालेली मते
सहकारी संस्था मतदारसंघ
संदिप कारमवार 154 मते विजयी
सुमित आरेकर 202 मतांनी विजयी 

सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघ
चंदा कामडी व उषा शेरकी 

सहकारी संस्था सर्वसामान्य गटातून
राकेश रत्नावार -205 मत्तानी विजयी
राजेद्र कन्नमवार - 171 मत्तानी विजयी
अखिल गागरेडीवार -200 मत्तानी विजयी
घनश्याम येनुरकर - 205 मत्तानी विजयी
सुनिल गुज्जनवार -200 मत्तानी विजयी
किशोर घडसे - 189 मत्तानी विजयी
हसन वाढई- 186 मत्तानी विजयी

व्यापारी संघटनेतून अमोलभाऊ बच्चूवार 129 व अडत्या मधून तोलाराम घोगरे 108मतांनी विजयी 

ग्रामपंचायत मतदारसंघातून
राहुल मुरकुटे 114 मतांनी विजयी 
जालींद्र बांगरे 345 मतानी विजयी 
लहुभाऊ कडस्कर 303 मतांनी विजयी दन
शालीक दहीवले 99 मतांनी विजयी

Post a Comment

0 Comments