Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वाईस ऑफ डिजिटल मीडियाच्या मूल तालुका अध्यक्षपदी अमित राऊत यांची निवड #Amit Raut has been elected as Mool Taluka President of Vice of Digital Media

वाईस ऑफ डिजिटल मीडियाच्या मूल तालुका अध्यक्षपदी अमित राऊत यांची निवड

मूल प्रतिनिधी

सकारात्मक पत्रकारीतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ डिजीटल मिडीया ची चंद्रपूर जिल्हा कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांची पदे जाहिर करण्यात आली. मूल तालुका अध्यक्ष पदी अमित राऊत यांची निवड करण्यात आली आहे.

गेल्या बारा वर्षापासून हे पत्रकारितेत आपले योगदान देत आले आहे. त्यांनी पब्लिक पंचनामा, प्रिंटमेंल , दैनिक भास्कर, सर्च टीव्ही यासारख्या प्रसिद्ध वर्तमानपत्र आणि टीव्ही चैनल मध्ये काम केले आहे. सध्या ते मूल लाईव्ह न्यूज नेटवर्क या पोर्टलचे संपादक असून युट्युब चॅनेल सुद्धा ते सांभाळत आहे.

व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, व्हाईस ऑफ मीडिया डिजीटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांचे अनुमतीने ही कार्यकारीणी डिजीटल विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी जाहीर केली आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीत मूल तालुका अध्यक्षपदी अमित राऊत यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल अमित राऊत यांनी डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष विजय सिद्धावार आणि सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले आहे. या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments