"भीम आर्मी विद्यार्थी फेडरेशन" तर्फे 60 हजारांची मदत, विहार बांधकामासाठी दिला मदतीचा हात
तालुक्यातील जुनासूर्ला या गावातील बौद्ध समाजाने बुद्ध विहार बांधकामाचा निर्धार केला होता व बांधकामास सुरुवात केली होती. मात्र जगात कोरोना महामारीचा उद्रेक झाल्याने सर्वत्र संचारबंदी लागू झाली व नाईलाजाने बौद्ध विहराच्या कामास स्थगिती दिली. कोरोना काळानंतर काही प्रमाणात बौद्ध विहारचे काम अपूर्ण राहिले होते व आर्थिक तरतूद प्राप्त न झाल्याने बौद्ध विहाराच्या कामास विलंब होत आला. ही बाब समाजातील युवकांनी लक्षात घेत, "भीम आर्मी विद्यार्थी फेडरेशन" ची स्थापना करून युवकांनी मासिक बचत केली. तसेच गावात नाटकाचे आयोजन करून विहार बांधकामासाठी निधी गोळा केला.
दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे विविध स्वरुपी कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध समाज करीत असतो. या वर्षी सुद्धा भीम जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. याचे औचित्य साधत "भीम आर्मी विद्यार्थी फेडरेशन" तर्फे बुद्ध विहाराचे काम चालू करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ६०,००० रुपये देऊन समाजाला हातभार लावला. समाजातील युवकांनी अतिशय सुदंर काम केले याचा आनंद व्यक्त करीत फेडरेशन मधील युवकांचे कौतुक केले गेले.
यावेळेस बौद्ध समाजाचे अध्यक्ष राकेश गोवर्धन, सचिव प्रफुल मेश्राम, राजेश गोवर्धन, नागनाथ घोनमोडे, महेंद्र घोनमोडे, प्रेमदास गोवर्धन, विलास गोवर्धन, सुधीर गोवर्धन, हंसराज गोवर्धन, रोशन उराडे, कल्पक बांबोडे, गौरव गोवर्धन, शुभम उराडे, शुभम नगदवणे व आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
0 Comments