Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्र्यांना निवेदन, शेतकरी-शेतमजूर परिषदेचे नेतृत्व #Representation to Chief Minister for various demands of farmers, leadership of Farmer-Farm Labor Council

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्र्यांना निवेदन, शेतकरी-शेतमजूर परिषदेचे नेतृत्व

मूल प्रतिनिधी

मुल तालुक्यातील शेतकरी विविध मागण्या घेऊन तहसील कार्यालयात तहसीलदार यांना अखिल भारतीय माळी महासंघ प्रणित शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

वन्य प्राण्यापासून पिकाचे व शेतकरी शेतमजुरांची होणारे जीवितहानी ताबडतोब थांबविणे, वन्य प्राण्यांमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात यावी, शेती करिता सिंचनाची आणि कुंपणाची सोय करण्यात यावी, वनप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबाला 1 कोटी रुपये व जखमी झालेल्या 25 लाख रुपयांचे नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, वन्य प्राण्यांपासून झालेल्या हल्ले व त्याच्या विरोधात वनविभागावर गुन्हे दाखल करण्याची तरतूद करण्यात यावी, शेतकऱ्यांना वार्षिक प्रती एकरी 10 हजार रुपये मजूर खर्चाचे त्वरित नियोजन करण्यात यावे, अतिक्रमण धारकांना जमिनीचे स्थायी पट्टे देण्यात यावे अशा प्रकारच्या विविध मागण्या घेऊन शेतकरी आज मूल तहसील कार्यालयावर धडकले.

निवेदन देताना चे नेतृत्व मूल पंचायत समितीच्या माजी सदस्या वर्षा लोनबले, तालुका प्रमुख ओमदेव मोहूर्ले , सामाजिक कार्यकर्ते नंदू बारस्कर, ईश्वर लोणबले, गुरु चौधरी, डॉ. पद्माकर लेनगुरे, गुलाब शेंडे, हसन वाढई, मनोज मोहुरले, वासुदेव गुरूनुले, गजानन चौधरी, मारोती शेंडे, संजय चौधरी, प्रदीप वाढई ,संदीप चिताडे, सुभाष सोनुले, चंदू चटारे, ममता सोनुले, उषा शेंडे, माया शेंडे, रविंद्र चौधरी, अनिल निकेसर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments