Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जन्मदिनी ऑटो चालक व रिक्षा चालकांना दुपट्टा भेट #Dupatta gifts to birthday auto drivers and rickshaw drivers

जन्मदिनी ऑटो चालक व रिक्षा चालकांना दुपट्टा भेट

Dupatta gifts to birthday auto drivers and rickshaw drivers

मूल प्रतिनिधी

मूल शहरातील सामाजिक युवा कार्यकर्ते चैतन्य प्रभाकर भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त ऑटो चालक आणि रिक्षा चालकांना दुपट्टे भेट देत वाढदिवस साजरा केला.

रिक्षा चालक व ऑटो चालककाना आपला उदरनिर्वाह करण्याकरिता भर उन्हात कष्ट करत फिरावे लागते. काही वेळ उन्हात उभे राहण्याची वेळ येत असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षीच उन्हाचा पारा वाढत असतो. उन्हाची दाहकता लक्षात घेऊन मूल शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते चैतन्य प्रभाकर भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरांतील ऑटो चालक व रिक्षा चालक यांना दुपट्टा भेट देण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांकडून वाढदिवसानिमित्त आशीर्वाद ही घेतला.

यावेळी चैतन्य भोयर, हितेश निकोडे, आकाश गुरनुले, तेजस महाडोळे, भीमा चौखुंडे, महेंद्र जेंघठे, गोलू भोयर , गौरव गोहने, शिवम चल्लावार आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments