Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नाटक, शंकर पटाची परवानगी घेणे आवश्यक - तहसिलदार रविंद्र होळी, चिचाळा भेजगाव आयोजकांवर गुन्हा दाखल

नाटक, शंकर पटाची परवानगी घेणे आवश्यक - तहसिलदार रविंद्र होळी, चिचाळा भेजगाव आयोजकांवर गुन्हा दाखल

मूल प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्हयातील मुल तालुक्यात माहे ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत मोठया प्रमाणात नाटक, शंकर पट , दंडार कार्यक्रम भरविण्यात येतात. त्याअनुषंगाने तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचे कडून आयोजकांनी नियमानुसार कार्यक्रमाची तथा प्रयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

परंतु दिनांक 07 मार्च 2023 रोजी चिचाळा येथे आयोजित केलेल्या नाटकाची तसेच दिनांक 22 मार्च 2023 रोजी भेजगांव येथे आयोजित केलेल्या नाटकाची परवानगी आयोजकांनी घेतली नव्हती. नाटकाला मोठया प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता याबाबत प्रशासनाला कल्पना असणे आवश्यक आहे. जेणेकरून कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. व झाला तर प्रशासनास त्यावर वेळीच उपायोजना करता येईल.
मात्र चिचाळा व भेजगाव गावात कार्यक्रमाला परवानगी न घेता आयोजकांनी नाटकाचे आयोजन करत प्रचलीत कायदेशीर प्रक्रियेला बगल दिली असल्याने त्यांच्याविरूध्द पो.स्टे. मुल येथे अपराध क्र. 0119 - दिनांक 28.03.2023 व 0121 - 29.03.2023 अन्वये 188 भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापुढे अशा प्रकारच्या नाटकांचे आयोजन करतांना पुर्वपरवानगी घेण्याचे आव्हान तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी डॉ. रविद्र होळी व पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments