Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कर्तव्य निभावत मूल पोलीस स्टेशन येथे महिला दिन साजरा#women day

कर्तव्य निभावत मूल पोलीस स्टेशन येथे महिला दिन साजरा

मूल प्रतिनिधी

पोलीस स्टेशन मुल येथे जागतिक महिला दिना निमीत्य पोलीस अधिक्षक रविन्द्रसिंह परदेशी तसेच अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम याचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यानी पोलीस स्टेशनचा संपुर्ण कार्यभार मपोउपनि नेहा सोळकी याना ठाणे प्रभारी अधिकारी पदी नियुक्त करून त्याना सन्मानित करण्यांत आले.

पोलीस स्टेशन डयुटी ऑफीसर म्हणुन महिला सफौ. कल्पना कुळमेथे, मदतनिस मपोअ सिमा वर्मा, स्टेशन डायरी, टि.ओ. टि. डयुटी मपोअ शालीनी नैताम, किरण नागोसे व इतर महत्वाचे डयुटीवर महिला अंमलदार याना नियुक्त करण्यांत आले. व संपुर्ण पोलीस स्टेशन येथील कामकाज महिला अधिकारी अंमलदार याचेकडे सुपुर्द करून जागतिक महिला दिन साजरा करण्यांत आला.

Post a Comment

0 Comments