Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या भविष्याची भाकर आहे ती मिळालीच पाहिजे राजू झोडे यांचे मत


जुनी पेन्शन योजना संपात सामील कर्मचाऱ्यांना राजु झोडे यांनी दिली भेट

जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या भविष्याची भाकर आहे ती मिळालीच पाहिजे राजू झोडे यांचे मत

मूल प्रतिनिधी

महाराष्ट्रात जुनी पेन्शन व इतर मागण्यांसाठी मागील १४ तारखेपासून बेमुदत संप कर्मचाऱ्यांनी घोषित केला होता. चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने संपात सहभाग घेतला होता. मुल येथे उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली व मार्गदर्शन केले.
        या देशातील बहुतांश कर्मचारी हा बहुजन वर्गातून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात नोकरदार वर्गासाठी पेन्शन, बोनस, ग्रॅज्युएटी, कामाचे तास, नोकरीची सुरक्षा असे अनेक कायदे अमलात आणले. त्यामुळेच कर्मचारी हा सन्मानाने जगत आहे. परंतु या भाजपा काँग्रेस सरकारने २००५ पासून कर्मचाऱ्यांची हक्काची पेन्शन बंद केली. पेन्शन बंद झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्याची व आपल्या कुटुंबाचे पालन पोषणाची चिंता सतावू लागली आहे. जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे याकरिता राज्यभरात मागील कित्येक वर्षापासून तीव्र लढा सुरू आहे. हा लढा कर्मचाऱ्यांचा हक्काचा असून जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत संप मागे घेऊ नये असे प्रतिपादन राजू झोडे यांनी व्यक्त केले. जुनी पेन्शन योजना न्यायिक हक्क असून भीक नाही आणि ती मिळालीच पाहिजे याकरिता माझा व माझ्या संघटनेचा कायम पाठिंबा राहील असेही राजू झोडे यांनी संपकऱ्यांना भेट देताना सांगितले. सदर संपाला भेट दिल्यामुळे संपातल्या कर्मचाऱ्यांनी राजू झोडे यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments