Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी अनिस चा कार्यक्रम संपन्न

संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी अनिस चा कार्यक्रम संपन्न

मूल प्रतिनिधी


 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती तालुका शाखा मुल चे वतीने कर्मचाऱ्यांना संविधानिक अधिकार मिळणे, कर्मचाऱ्यांना  जुनी पेन्शन मिळण्यासंबंधाने सुरू असलेल्या संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी दिनांक १७/३/२०२३ ला दुपारी २ वाजता तहसील कार्यालय मुल येथील मैदानात महा. अनिस मुल तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महा. अनिस मुल चे अध्यक्ष मान. दिलीप गेडाम साहेब यांनी समाज  अंधश्रद्धा मुक्त करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे आवश्यक आहे  असे सांगितले. अनिस. मुल तालुका पदाधिकारी मान. सहदेव रामटेके साहेब यांनी अगरबत्ती कशाप्रकारे गोल गोल फिरते, तसेच होम हवन करतांना कशाप्रकारे आपोआप पेटते हा प्रयोग करून दाखविला. तसेच अनिस. कार्यकर्ते मान. वालदे साहेब यांनी कोऱ्या पाटीवर मंत्राने "एकच मिशन, जुनी पेन्शन" असे लिहून दाखविले तसेच दोरीत नारळ वर, खाली व मध्ये कशा प्रकारे स्थिर राहते, तसेच पिशवी मधून बॉल कशाप्रकारे गायब होतो असे प्रात्यक्षिक करून गैरसमज दूर करण्यात आले. बुवाबाजी, भूतखेत अशा प्रकारच्या अंधश्रद्धा असून त्याचे निरसन करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाला महा अनिस. मुल चे  अध्यक्ष मान. दिलीप गेडाम, अनिस पदाधिकारी मान. जी. एम. बांबोळे सर, मान. यशवंत देवगडे सर, मान. सिंधूताई गोवर्धन मॅडम, मान. रुपदेव गेडेकर साहेब, मान. बबन रंगारी, मान. सपनाताई निमगडे यांनी सहकार्य केले. संपात सहभागी बहुसंख्येने कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक मान. दिलीप गेडाम अनिस अध्यक्ष मुल यांनी केले.
    

Post a Comment

0 Comments