Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मारोडा येथील घरकुल लाभार्थ्यांना अग्रीम हप्ता द्या - प्रशांत उराडे, घरकुल लाभार्थ्याची पंचायत समिती येथे निवेदनाद्वारे केली मागणी

मारोडा येथील घरकुल लाभार्थ्यांना अग्रीम हप्ता द्या - प्रशांत उराडे, घरकुल लाभार्थ्याची पंचायत समिती येथे निवेदनाद्वारे केली मागणी

मूल प्रतिनिधी

मौजा मारोडा येथील पात्र घरकुल लाभार्थ्यांचे मागील कित्येक महिन्यापासून अग्रीम रक्कम पंचायत समिती कार्यालयाकडून लाभार्थ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम रखडलेले आहे. घरकुल लाभार्थ्यांनी कित्येकदा पंचायत समितीला जाऊन चकरा मारत आहेत तरी त्यांचे रक्कम अजूनही जमा झालेली नाही. त्यामुळे उलगुलान संघटनेचे जिल्हा संयोजक प्रशांत उराडे यांच्या नेतृत्वात घरकुल लाभार्थ्यांनी पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ अग्रीम रक्कम जमा करावी अशी मागणी केली.

अग्रीम रक्कम जमा होत नसल्यामुळे घरकुलाचे बांधकाम अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना घराचे बांधकाम सुरू कसा करावे हा प्रश्न पडलेला आहे. प्रशासकीय स्तरावरून तात्काळ घरकुलाचा अग्रीम निधी लाभार्थ्यांना जमा करावी याकरिता संघटनेकडून निवेदन देऊन मागणी करण्यात आली. जर तात्काळ घरकुलाची बिले जमा केली नाही तर या विरोधात संपूर्ण लाभार्थी पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असा घरकुल लाभार्थ्यांनी शासन व प्रशासनाला इशारा दिला.निवेदन देताना उलगुलान संघटनेचे प्रशांत उराडे, निरंजन वाळके, रमेश नैताम , मधुकर गुरूनुले,कैलाश मेश्राम, घनश्याम करेवार,सिमाताई भोयर,आकाश दहीवले, नरेंद्र वाळके तथा अन्य घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments