Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नवभारत विद्यालय मूल येथे जागतिक महिला दिन साजरा

नवभारत विद्यालय मूल येथे जागतिक महिला दिन साजरा

मूल प्रतिनिधी
 

शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित नवभारत विद्यालय मूल येथील शाळेच्या पर्यवेक्षिका सन्माननीय श्रीमती राजमलवार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.08/03/2023रोज बुधवारला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला..
या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षिका सौ.व्ही.एस.भांडारकर मॅडम तसेच विज्ञान शिक्षिका कु.उमक मॅडम,कु.गोंगल मॅडम,कु.तलांडे मॅडम यांनी आपले स्थान भुषविले... 
प्रथमतः थोर कर्तृत्ववान स्त्रिया माता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन, पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले...
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री माथनकर सरांनी केले...
यानंतर थोर कर्तृत्ववान स्त्रियांचे कार्य व त्यावर गीतगायन कविता सादरीकरण...विद्यार्थिनींनी केले..त्यानंतर जेष्ठ शिक्षक श्री डांगरे सर व गुरुदास चौधरी सरांनी थोर महिलांचे कार्य आपल्या भाषणातून व्यक्त केले...त्यानंतर कु.गोंगल व तलांडे मॅडमनी थोर महिलांवर कविता सादर केली.. जेष्ठ शिक्षिका सौ.भांडारकर मॅडमनी स्त्रि ही पुरुषांच्या बरोबरीने काम करते व देशाच्या प्रगतीपथासाठी, विकासासाठी तत्पर असते तसेच स्त्रियांच्या कार्याचा आदर सन्मान व्हावा. हे आपल्या भाषणातून व्यक्त केले..त्यानंतर उमक मॅडमनी आपल्या भाषणातून स्त्री ही बाळाला जन्म देऊन नवनिर्मिती करते.म्हणून ती श्रेष्ठ आहे हे ठासून सांगितले .. तसेच स्त्रियांनी आपल्या अधिकार व कर्तव्याचा गैरवापर करुन नये हे सांगितले.. शेवटीं अध्यक्षिय भाषणातून श्रीमती राजमलवार मॅडमनी सांगितले की, पति नसतांनाही स्त्रि ही बाळाचा एकटी सांभाळ करु शकते... तसेच स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा चांगल्या भावनेचा असावा.. असे सांगितले 
सर्वांच्या भाषणातून प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक महिलांचे कार्य ओसंडून वाहत होते...
शाळेचे मुख्याध्याक सन्माननीय श्री.ए.एच.झाडे सरांनी आपल्या भाषणातून थोर महिलांचे कार्य सांगून शाळेतील सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या..
सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका ,सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते..
या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कुष्ठ असे सूत्रसंचालन श्री निमसर सरांनी केले.

Post a Comment

0 Comments