Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

"वृंदावन" काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा #"Vrindavan" Anthology Release Ceremony

"वृंदावन" काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा

मूल प्रतिनिधी

येथील रहिवासी असलेल्या जि.प. शिक्षिका वृंदा पगडपल्लीवार यांच्या 'वृदांवन 'या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा  दि २६ मार्च रोजी रविवारला गोंडपिपरी येथील खैरे कुणबी भवन येथे होणार आहे.रसिक वाचकांना या निमित्ताने काव्य अभंगाची मेजवानी मिळणार आहे.

पंचायत समिती मुल अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जूनासुर्ला येथे त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.कवयित्री वृंदा पगडपल्लीवार यांच्या स्वलिखित 'वृंदावन 'काव्यसंग्रहातुन संत,महात्म्यांचे अभंग त्यांच्या अभंगातुन मिळणारी जीवन जगण्याची कला,याचे अतिशय सुंदर व काव्यात्मक वर्णन त्यांनी केलेले आहे.महाराष्ट्र हि संताची भुमी या महाराष्ट्रातील अनेक थोर संतांनी आपल्या अभंगातून मानवी मुल्याची शिकवण दिली आहे.अभंगातून समाजाच्या तळागाळापर्यंत मानवी संस्काराची जाणीव निर्माण करण्याचं व जोपासण्याचं महत्वपुर्ण कार्य  वृंदावन अभंग संग्रहाच्या माध्यमातून होणार आहे. सदर काव्यसंग्रहातुन कवयित्री यांनी कोणत्याही अभंगावर अवडंबर न करता प्रत्येक संताच्या अभंगावर प्रकाश टाकलेला आहे. अत्यंत साधी व सोप्या भाषेत रसिक वाचकांना संतचरित्र सहज अभ्यासता येणार आहे. हे विशेष.

कवयित्री वृंदा पगडपल्लीवार या मूल शहरातील रहीवासी आहेत. मुलांच्या शिक्षणाबरोबर कविता, लेख लिहणे हा त्यांचा मुळातच छंद असल्याने त्या कवितेत रमत असत आणि त्यातूनच 'वृदांवन 'काव्यसंग्रहाची निर्मीती झाली.या पुर्वी सुध्दा त्यांचे लेख,कविता वृत्तपत्रातुन प्रकाशित झाले आहेत. या काव्यसंग्रहातुन मानवी मुल्यांची जडणघडण वाचक रसिकांना अभ्यासायला मिळणार आहे. त्यांच्या या काव्यसंग्रहाला रसिक  वाचकांकडुन हार्दीक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments