Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मालमत्ता करावरील २ टक्के व्याज रद्द करा - मूल तालुका काँग्रेसची मागणी #Abolish 2 percent interest on property tax - Mula Taluka Congress demands

मालमत्ता करावरील २ टक्के व्याज रद्द करा - मूल तालुका काँग्रेसची मागणी

Abolish 2 percent interest on property tax - Mula Taluka Congress demands

मूल प्रतिनिधी

मूल नगर परिषदेने माहे डिसेंबर नंतर घरटॅक्स,मालमत्ता कर व पाणीकर भरणाऱ्या मूल ही नगर वासियनागरिकांना प्रतिमाह २ टक्के व्याज भरण्याचे नोटीस दिल्याने  मुलच्या नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वी असा निर्णय आतापर्यंत नगर प्रशासनातर्फे घेतलेला नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना महागाईच्या काळात आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ आली असल्याने  मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे मार्गदर्शनाखाली  मुल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना निवेदन दिले

मूलच्या नागरिकांना आतापर्यंत न.प. चा कोणताही कराचा भरणा हा ३१ मार्च पर्यांतच भरावा लागतो असे माहीत आहे. आणि नगर परिषदेचे मालमत्ता विभागाचे कर्मचारी सुद्धा मालमत्ता कराची वसुली ३१ मार्च पर्यंत नागरिकांच्या वॉर्डांत घरी जाऊन करीत असल्याचे नागरिकांना ज्ञात आहे. आणि गावात गरीब नागरिकांना कोणताही रोजगार नसल्याने  पैशाच्या अडचणी मुळे बाहेर राज्यात मिरची व चना कापण्यासाठी गेले असल्याने ते परत आल्यावरच कर भरणार असल्याने त्यांना जुन्या पद्धतीनुसार ३१ मार्च पर्यंत मुदत द्यावी अशी मागणी निवेदन देताना करण्यात आली.          
              
मुख्याधिकारी यांना निवेदन देताना मुल तालुका काँग्रेस अध्यक्ष  गुरुदास गुरनुले, न.प.माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार, माजी तालुका अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती घनश्याम येनुरकर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक राजेंद्र कन्नमवार, महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली संतोषवार, माजी नगर सेवक विनोद कामडे ,लीना फुलझेले, महिला काँग्रेसच्या शामला बेलसरे, संचालक विवेक मुत्यलवार, शहर महासचिव कैलास चलाख, उपाध्यक्ष संदीप मोहबे, अन्वर शेख, गणेश रणदिवे, राकेश मोहुरले, मल्लेश आरेवार यांचेसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनाच्या मान.जिल्हाधिकारी, नगर प्रशासक यांनाही दिले आहे. नगर प्रशासक यांचेकडून नागरिकांना अचानक बसणाऱ्या व्याजाची वसुली करुन जनतेला वेटीस धरण्यात आले तर  जनतेच्या हितासाठी  तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा निवेदना मधून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments