Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल शहरातील केंद्रावर बारावीची परीक्षा शांततेत, कापीमुक्त अभियान 12th exam at center in mul city in peace, copy free campaign

मूल शहरातील केंद्रावर बारावीची परीक्षा शांततेत, कापीमुक्त अभियान 
12th exam at center in mul city in peace, copy free campaign

मूल प्रतिनिधी 

मूल शहरातील कर्मवीर महाविद्यालयात बारावीच्या परिक्षेचे केंद्र असून या केंद्राचा केंद्र क्रमांक ०२३८आहे. प्राचार्या अनिता वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र प्रमुख ए.आर.सेलेकर सगळी व्यवस्था अतिशय काळजीपूर्वक हाताळत आहेत. या परीक्षा केंद्रावर एकुण ४१३ विद्यार्थी परिक्षेसाठी नोंदणीकृत आहेत.

महाराष्ट्र शासनाने व शिक्षण विभागाने कापीमुक्त अभियान राबविण्याचे जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे भरारी पथक तयार करून,शिक्षण विभागाच्या भरारी पथकांव्यतिरिक्त परीक्षा काळात अभियानाच्या यशस्वीतेसाठी परीक्षा केंद्रावर भेटी देऊन परीक्षा सुरळीतपणे पार पडावी व कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी गठन करुन भेटी देण्यासाठी आदेश दिले आहेत.

केंद्र प्रमुख सेलेकर जातीने लक्ष देऊन सारी व्यवस्था न्याहाळत होते,आज बारावी गणित विषयाचा पेपर होता त्यासाठी विज्ञान शाखेचे १७४ आणि ४५ विद्यार्थी एमसिव्हिसीचे परीक्षा देत होते तर उपस्थित शिक्षक वर्ग आपली जबाबदारी चोख बजावत होते आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी आपले पेपर सोडविण्यासाठी प्रयत्नशील होते, कुठेही कसलाच गैरप्रकार व्हावा अशी लक्षणे दिसली नाहीत, काही विद्यार्थी अतिशय गंभीरपणे प्रश्न सोडविताना दिसलेत तर काही चिंताग्रस्त परंतू शांतपणे सारेकाही सुरळीत सुरु दिसले. विधानसभा पेपरफुट प्रकरणाने गाजत असली तरीही त्याचा इथे साधा लवलेशही आढळून आला नाही हे विशेष. 

प्राचार्या आपल्या कक्षात असलेल्या सीसीटीव्हीत सारी व्यवस्था न्याहाळत लक्ष ठेवून होत्या. आमच्या प्रश्नांची उत्तरे देतांना त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस अधिकारी आणि वेगवेगळ्या भरारी पथकांनी या केंद्राला भेटी दिल्या असल्याचे स्पष्ट केले व परीक्षा पहिल्या मजल्यावर असल्याने बाहेरच्या कुणी इथे दखल देण्याचा प्रश्नच येत नसल्याची ग्वाही दिली.

Post a Comment

0 Comments