Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल शहरात पोहचली विदर्भ निर्माण यात्रा, घोषणांनी मूल शहर दुमदुमले #Vidarbha Nirman Yatra

मूल शहरात पोहचली विदर्भ निर्माण यात्रा, घोषणांनी मूल शहर दुमदुमले

Vidarbha Nirman Yatra reached the city of Mul, the city erupted with slogans

मूल प्रतिनिधी 

विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी, नक्षलवाद्याला आळा घालण्यासाठी, प्रदूषण व कुपोषण संपविण्यासाठी आणि बेरोजगाराच्या रोजगारासाठी विदर्भ मिशन 2023 अंतर्गत विदर्भ निर्माण यात्रा कालेश्वर ते नागपूर असा प्रवास करणार आहे. ही विदर्भ निर्माण यात्रा आज मूल शहरात पोहचली.

यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. मूल शहरातील विदर्भ वादी कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यात्रेत अर्जुनी केदार, किशोरजी दहीकर, ज्योती खांडेकर, मुकेश मासुरकर, तात्यासाहेब मते, राठोड गजबे आदी  पदाधिकारी यांचे यावेळी मार्गदर्शन झाले.

यामध्ये केंद्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे, विजेचे दरवाढ राज्य सरकारने सरकार मागे घ्यावी, शेती पंपाला दिवसाचे लोड शेडिंग बंद करावे, वैधानिक विकास मंडळ नको विदर्भ राज्य हवे अन्नधान्यातील जीएसटी तात्काळ रद्द करावी अशा वेळेत मागण्या या यात्रे दरम्यान करण्यात आल्या.

यावेळी कवडू येनप्रेड्डीवार, ओमदेव मोहर्ले, विवेक मांदाडे, संदीप चिताडे, प्रवीण भरतकर आणि मूल शहरातील विदर्भवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments