Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पट्टेदार वाघाच्या हल्यात गुराखी जखमी, कच्चेपार येथील घटना #tiger attack

पट्टेदार वाघाच्या हल्यात गुराखी जखमी, कच्चेपार येथील घटना

सिंदेवाही (अमान क़ुरैशी)


सिंदेवाही वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र सिंदेवाही बिटातील (कच्चेपार) गट क्रमांक 147 मध्ये गुराखी बाबुराव लक्ष्मण देवताळे ( 56) याच्यावर जंगलातून गुरेढोरे चारून घराकडे येत असतांना सायंकाळी ५:३० च्या सुमारास पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.

कच्चेपार येथील गुराखी बाबुराव देवतळे हा आपल्या दैनंदिनीनुसार जंगलातून गुरेढोरे चारून घराकडे आणत असतांना अचानक पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले.
त्याक्षणी संजय रामदास नैताम रा. कच्चेपार हे आपल्या शेतावरून तणशीचा गठ्ठा घेऊन घराकडे येत असतांना त्यांना मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने डोक्यावरील तणशीचा गठ्ठा तेथेच टाकून त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली.
तेव्हा पट्टेदार वाघाने गुराखी बाबुराव यांना पकडले होते. प्रसंगावधान राखून संजय यांनी आरडाओरड करत गावात फोन लावून घडलेली घटना सांगितली. लागलीच गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठलं. तेव्हा वाघाने पळ काढला.

सदर घटनेची माहिती मिळताच वनरक्षक कोहाडे तसेच गावातील धनराज सरपाते, साईनाथ सोनट्टके, प्रभाकर गव्हारे,रवींद्र कोवे, मुखरू जिवतोडे, सुमित चलाख, केजराज सरपाते व अमोल कोवे यांना कळताच त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबुराव यांना प्राथमिक उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.

यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी सालकर, उपक्षेत्र अधिकारी हटवार, उपक्षेत्र अधीकारी पेंदोर, वनरक्षक चौधरी उपस्थित होते.
बाबुराव देवताळे यांची प्रकृती चिंताजनक गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

यावेळी वनविभागाच्या वतीने उपक्षेत्र अधिकारी हटवार यांनी ५०००/- रुपयांची तातडीची आर्थिक मदत परीवारातील सदस्यांकडे सुपुर्द केली.
परंतू सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने तात्काळ या वाघाचा बंदोबस्त करावा आणि बाबुराव देवताळे यांना योग्य आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Post a Comment

0 Comments