Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पद्मशाली समाजाने साजरा केला शिवजयंतीसह महाशिवरात्र महोत्सव

पद्मशाली समाजाने साजरा केला शिवजयंतीसह महाशिवरात्र महोत्सव

मूल प्रतिनिधी

मूल तालुका व बेंबाळ पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने बेंबाळ येथे शिवजयंतीसह महाशिवरात्र महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बेंबाळ समाजाचे अध्यक्ष नंदुभाऊ आकनुरवार सहअध्यक्ष विजय बोम्मावार माजी सरपंच होते प्रमुख अतिथी चंद्रपूर जिल्ह्य पद्मशाली समाज संघटना तथा विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटना अध्यक्ष डॉ बंडूभाऊ आकनुरवार, मुल समाजाचे अध्यक्ष सुधाकरराव कोकुलवार, तालुका सचिव प्रमोद कोकुलवार, मुल समाज सचिव महेंद्र दुस्सावार, शंंकर आकनुरवार, अॅड अनंता बल्लेवार, सौ रागिणी आडेपवार, सौ बल्लेवार,रत्नाकर बोर्डेकर, शंकर दिगदेवतुलवार, तुळशीदास मारशेट्टीवार, अरूण आकनुरवार उपस्थित होते यावेळी विजय बोम्मावार सपत्नीक व समाज बांधवांनी विधीवत पुजा,पुष्पहार व आरती करण्यात आली. जिल्ह्य अध्यक्ष डॉ बंडू आकनुरवार यांनी तालुका कार्यकारिणी व समाज बांधवांना एसबीसी शासननिर्णय,
राज्य मागासवर्ग आयोग अहवाल व प्रपत्रे दिली यावेळी डॉ बंडू आकनुरवार,अॅड अनंता बल्लेवार,विजय बोम्मावार, नंदु आकनुरवार,सुधाकर कोकुलवार,महेंद्र दुस्सावार, प्रमोद कोकुलवार,सौ रागिणी आडेपवार,यांनी समाज संघटन,प्रबोधन,विकास व एसबीसी आरक्षणाबाबत मार्गदर्शन केले.बेंबाळ येथील गजानन आकनुरवार यांच्या दोन मुलाचे नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल त्यांचे व मुलाचे अभिनंदन करून त्यांचे समाजबांंधवानी आदर्श घेेण्याबाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व संचालन विजय बोम्मावार आभार प्रमोद बोडुवार यांनी केले यशस्वीतेसाठी भारत आकनुरवार,धनंजय आकनुरवार, सुहास आकनुरवार,सौ दर्शनाताई विनोद बेतवार,सौ जयाताई संदीप आनंदपवार,रूपेशअनमलवार ,दौलत चामलवार व समाज बांधवांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments