Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न, मूल उपजिल्हा रुग्णालयाचा उपक्रम, On the occasion of Chief Minister Eknath Shinde's birthday, the health camp was completed, activities of the child upazila hospital

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न, मूल उपजिल्हा रुग्णालयाचा उपक्रम

On the occasion of Chief Minister Eknath Shinde's birthday, the health camp was completed, activities of the child upazila hospital

मूल प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त मूल येथिल उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी केले. 

या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, गर्भवती स्त्री तपासणी, नवजात बालकांची तपासणी, अस्थिरोग, दंतरोग, रक्त तपासणी, आयुष विभागातील तपासणी आदी तपासण्या करून उपचार करण्यात आले. रुग्णांनी शिबिराचा लाभ मोठया संख्येने घेतला. माजी नगराध्यक्ष भोयर यांनी प्रत्यक्ष शिबिराला भेट देऊन रुग्णांची विचारपूस करत काळजी घ्यायला सांगितले. ज्येष्ठ रुग्णांना आधी तपासणी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी भाजपा कार्यकर्त्या चावरे, स्त्री रोग तज्ञ डॉ. रेवतकर, डॉ. इंदुरकर, डॉ. लाडे, डॉ.वसीम, अस्थिरोग तज्ञ डॉ.चांदेकर, दंत चिकित्सक डॉ.काटेखाये, डॉ.महेशकर, नेत्र सहाय्यक अधिकारी गुळधे, कृष्टरोग विभाग प्रकाश रंगारी,  सहाय्यक अधीसेविका रेखा ढाले, परिसेविका वैशाली वाघमारे, तळोधिकर, प्रिती नंदनवार आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments