Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल पोलीस स्टेशन येथे नाविन्यपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर, पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद #Health Camp

मूल पोलीस स्टेशन येथे नाविन्यपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर, पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मूल प्रतिनिधी


उपजिल्हा रुग्णालय मूल आणि पोलीस स्टेशन मूल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी आणि त्यांचे परिवाराकरिता चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक परदेशी यांचे मार्गदर्शनात आरोग्य शिबिराचे आयोजन पोलीस स्टेशन मूल येथे करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, उपजिल्हा रुग्णालय मूल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र लाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश बनसोड, सहायक पोलीस उपनिरीक्षक उत्तम कुमरे, सुनील घोडमारे, सचिन सायंकार आदी उपस्थित होते.

खाकी वर्दीतला पोलीस 24 तास ऑन ड्युटी करीत असतो. ड्युटी करताना आरोग्याची तमा न बाळगता सेवेत राहतो. अशा वेळेस स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. हाच उद्देश हेरून चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात मूल पोलीस स्टेशन येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात इसीजी, शुगर, बीपी, रक्त तपासणी, दंतचिकित्सक, नेत्ररोग अशा विविध रोगांची तपासणी व उपचार करण्यात आले.

यावेळी स्त्री रोग तज्ञ डॉ. प्राची खैरे, दंतरोग चिकित्सक डॉ. सविता काटेखाये, फिजिशियन डॉ. कनक वनकर, सर्जन डॉ. मनीष सिंग, ऑर्थोसर्जन डॉ. चांदेवार, जनरल फिजिशियन डॉ. बुरांडे, सायकॉलॉजिस्ट डॉ. दुर्गाप्रसाद बनकर, डॉ.तिरथ उराडे, डॉ. देब्रोतोकुमार विश्वास आदी डॉ. तपासणी केली.

यावेळी उपजिल्हा रुग्णालय मूल चे सर्व कर्मचारी आणि पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी आरोग्य शिबिर यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अधिपरिचारिका प्रियंका गणवीर यांनी केले.

Post a Comment

0 Comments