Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पालकमंत्री मुनगंटीवार बनले नि—क्षय मित्र, प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियान Guardian Minister Mungantiwar became Nikshaya Mitra, Prime Minister TB Mukt Bharat Abhiyan

पालकमंत्री मुनगंटीवार बनले नि—क्षय मित्र, प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियान

Guardian Minister Mungantiwar became Nikshaya Mitra, Prime Minister TB Mukt Bharat Abhiyan

मूल प्रतिनिधी


प्रधानमंत्री निक्षय पोषण योजनेअंतर्गत आणि प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार निक्षय मित्र बनले आहे. श्री माता कन्याका सेवा संस्था चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मूल तालुक्यातील क्षयरुग्णांना 74 अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.

क्षयरूग्णांना सकस आहार मिळावा, रोगप्रतिकार शक्ती वाढावी आणि रूग्णांचे आरोग्य सुदृढ राहावे या हेतुने शासनाने प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियान राबवित आहे. सदर पोषण किट वितरित करताना नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, भाजपा कार्यकर्ते राकेश ठाकरे,रवि बरडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सोनारकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.समीर थेरे, टीबी पर्यवेक्षक सुहास पिंपळे आदी उपस्थित होते.

टिबी निर्मुलन करण्याकरीता, टिबी रूग्णांना सहाय करण्याकरीता जनसहभाग वाढवुन निक्षय मित्र बनण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments