Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

भीषण आगीत प्रसिद्ध कापड दुकान जळुन खाक, मूल पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली, A famous textile shop was gutted in a fierce fire, a major accident was averted due to the vigilance of the Mool police

भीषण आगीत प्रसिद्ध कापड दुकान जळुन खाक, मूल पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली, A famous textile shop was gutted in a fierce fire, a major accident was averted due to the vigilance of the Mool police

मूल प्रतिनिधी

मूल येथिल प्रसिद्ध व्यापारी गोगिरवार ह्यांच्या दत्त साडी सेंटर ह्या कापड दुकानाला रात्री 12 च्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली मात्र मुल पोलीस, नगरपालिका, नगरसेवक प्रशांत समर्थ ह्यांचेसह परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी योग्य वेळी नियोजन केल्यामुळे आगीची भीषणता आटोक्यात ठेवता आली. परिसरातील इतर दुकाने व रहिवासी घरांचा बचाव करता आला.

सविस्तर वृत्त असे की मुल पोलीस रात्रीच्या गस्तीवर असताना जवळपास 12 वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम राठोड ह्यांना गोगिरवार ह्यांच्या दत्त साडी सेंटर ह्या कापड दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ मुल येथिल नगरसेवक प्रशांत समर्थ ह्यांना भ्रमणध्वनी वर घटनेची माहिती दिली. हे कळताच समर्थ ह्यांनी दुकानाचे संचालक बंडू गोगिरवार ह्यांना त्यांच्या दुकानाला आग लागल्याचे कळविले तसेच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून स्वतः घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान परिसरातील नागरिकांनाही ह्या अग्नितांडवाची माहिती मिळाली असल्याने नागरिकांनीही स्वतःच्या परीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. अग्निशमन दल तातडीने घटनस्थळी पोहचले व त्यांनी आग आतिक्यात आणली. मात्र दरम्यानच्या काळात दुकानातील लाखोंचे कापड जळुन खाक झाले.

Post a Comment

0 Comments