Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सऺत निरंकारी मंडळ मूल तर्फे स्वच्छता अभियान #Cleanliness campaign #somnath

सऺत निरंकारी मंडळ मूल तर्फे स्वच्छता अभियान

मूल प्रतिनिधी

संत निरंकारी मिशन अंतर्गत दरवर्षी 23 फरवरी गुरुपूजा दिवस संपूर्ण विश्वात आयोजित केल्या जातो अंतर्गत विविध उपक्रम राबविला जातात यावर्षी सुद्धा प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या मिशन अंतर्गत विविध जलस्तोत्रांची स्वच्छता राबविण्यात आली. यात संत निरंकारी मिशन मूल तर्फे सोमनाथ देवस्थान, धबधबा सफाई सेवा दल निरंकारी आणि साध सगत यांनी सफाई करण्यात आली. यात मारोडा ग्रामपंचायत यांचे सुद्धा योगदान लाभले.

सकाळी 8 वाजता सेवादल प्रार्थना करून सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेव यांच्या कृपेने अभियानाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला मूल ब्राॅच चे मूल ब्राॅच चे मुखी लक्ष्मणजी निकुरे, ग्रामपंचायतचे सरपंच भिकारु शेंडे, बंडूजी गेडाम ,किशोरजी गहाणे, अर्चनाची उईके, डॉक्टर राकेश पिपरे केरोडा, सोमेश्वर कंचावर खेडी , देवराम मोहुलै मॅनेजर सावली प्रकाश महाडोरे सेवादल इन्चार्ज महेश रेड्डीवार, कवडुजी कोल्हे, शेकडो निरंकारी अनुयायी उपस्थितीत होते. 12 वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments