Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे वीज वितरण कंपनीचे बिल भरण्यात आले

पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे वीज वितरण कंपनीचे बिल भरण्यात आले

बेंबाळ प्रतिनीधी
 

गडीसुर्ला येथील ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बेंबाळ परिसरातील एकूण 9 गावातील पाणी पुरवठा यंत्रणा मागील पंधरा दिवसापासून बंद झालेली होती. याचा फटका सामान्य नागरिकांना भरपूर प्रमाणात होत असल्याने बेंबाळ पंचायत समिती क्षेत्रातील सरपंच,उपसरपंच व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले लोकप्रतनिधींनी लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी पाणीपुरवठा योजने संदर्भात अनेक अधिकाऱ्यांशी फोनद्वारे चर्चा केली असता कोणत्याही अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता.

त्यामुळेच आपल्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी आपसात संपर्क साधत पाणीपुरवठा योजना पुन्हा एकदा सुरळितपणे चालू कशी करता येईल याबाबत चर्चा केली असता सर्वांनी मूल पंचायत समितीचे माजी सभापती चंदू मारगोनवार,मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पा. चुदरी,गडीसुर्ला ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय येनूरकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा अनुभव याप्रसंगी उपयोगी पडेल याभावनेने यांच्याशी चर्चा करीत लवकरात लवकर पाणीपुरवठा यंत्रणा चालू होईल अशी अपेक्षा व्यक्त झाली.

म्हणूनच चंदुभाऊ यांच्या माध्यमातून आपल्या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला व यावर तोडगा काढीत सुधीरभाऊच्या मार्गदर्शनाखाली मुन्नाभाऊ कोटगले माजी उपसरपंच ग्रा.पं.बेंबाळ,मूर्लीधरभाऊ चुदरी सरपंच बोंडाळा बूज,धिरजभाऊ गोहणे सरपंच बाबराळा,सागरभाऊ देऊरकर उपसरपंच नांदगाव,जितेंद्रभाऊ चुदरी उपसरपंच घोसरी,किशोरभाऊ पगडपल्लीवार सदस्य ग्राम.पं.बेंबाळ,राकेशभाऊ दहिकर सदस्य ग्राम.पं.बेंबाळ,समीरभाऊ काळे सदस्य गोवर्धन,दशरथभाऊ ठाकूर सदस्य ग्राम.पं.बाबराळा,नरेशभाऊ कोरडे ग्राम.पं.बाबराळा आदी सर्वांनी मिळून चंद्रपूर गाठून संबंधित अधिकारी यांना पाणीपुरवठा समस्यांबाबत मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या नावाखाली निवेदन सादर केला व या निवेदनाला उत्तम असा प्रतिसाद देत जि.प. कडून तात्काळ ४४ लाख रुपये पाणीपुरवठा यंत्रणेला पाठवण्यासाठी आदेश देत अधिकारी यांनी सर्वांना येत्या २-३ दिवसात पाणीपुरवठा योजना सुरू होईल याची खात्री पटवून दिली व त्याचबरोबर एक भाकीत सूचना केली की पाणीकर योग्यवेळी न भरल्यास ही समस्या पुन्हा उद्भवू शकते..ज्या लोकप्रतिनिधींनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी धडपड केली त्या धडपडीला न्याय मिळत आज संपूर्ण बेंबाळ परिसरातील गावांमध्ये पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे..

त्यामुळे सर्व विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वेळोेवेळी गावात फिरून पाणी कराबाबत जनजागृती करून नियमित पाणीकर भरण्यास लोकांना प्रवृत्त करावे तसेच पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवावी. नागरिकांना योजनेचं नेहमी लाभ मिळवून देण्याची जी मोठी जबाबदारी प्रशासनाने ग्रामपंचायतीवर टाकली आहे ती पूर्ण करावी. तसेच योग्यवेळी पाणीकर भरून शासनाला सहकार्य करावे.

आपल्या परिसरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आता ज्या पद्धतीने लोकहिताच्या दृष्टीने एकत्र येऊन या समस्येला सामोरे गेले त्याच पद्धतीने सदैव लोकहिताच्या दृष्टीने नेतेमंडळी राजकारण करावे. नाहीतर *गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा झाल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment

0 Comments