Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे भगवान विश्वकर्मा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न , सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी

मूल येथे भगवान विश्वकर्मा जयंती  महोत्सव उत्साहात संपन्न , सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी
 
मूल प्रतिनिधी

विश्व ब्राह्मण पांचाळ समाज बहुउद्देशीय संस्था मुल यांच्या वतीने विश्वकर्मा मंदिर येथे तालुक्यातील पांचाळ समाज बांधव आणि भगिनींच्या या उपस्थितीत विश्वकर्मा जयंती महोत्सव व समाज मेळावा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव जिरकुंडवार अध्यक्ष विश्व ब्राह्मण पांचाळ समाज मुल, प्रमुख पाहुणे डाॅ. शाम कुंदोजवार चंद्रपूर,  विनोद श्रीकुंडवार से .नि. शिक्षक, मोती टहलियानी माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुल , प्रकाश विरगमवार उपस्थित होते.  भगवान विश्वकर्माच्या प्रतिमेला मार्लारपण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  यावेळी महिलांसाठी हळदी कुंकु, रांगोळी स्पर्धा, भावगीत स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व दुर्बल घटकातील विधवा दोन महिलांना साडी  चोळी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बचत गट उपक्रमातून मंडळाला आथिर्क सहाय्य दिल्याबदल संदीप बदेलवार यांच्या समाजाच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. वर्ग १० वी १२ मध्ये समाजातुन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ६०% पर्यंत गुणवंत विद्यार्थी यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संजय येरोजवार कार्याध्यक्ष, विद्याधर मेडपल्लीवार उपाध्यक्ष, विलास यलचलवार सहसचिव, बाबुराव गनलावार,  दिलीप कटलावार, अभिजित चेपुरवार , अल्का राजमलवार, दिलीप अलगुणवार, विनायक कत्रोजवार, अभिजित राजुरवार, प्रदिप चिटलोजवार, लता जिरकुंटवार, नंदा तासलवार शिल्पा येलचलवार,  विना गनलावार, सरला वैरागडवार , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव  विजय वैरागडवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसचिव विलास यलचलवार यांनी केले. सहभोजनाने या उत्सापूर्वक कार्यक्रमाची  सांगता करण्यात आली. विश्व ब्राह्मण पांचाळ समाज बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments