Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

तेरवीच्या कार्यक्रमा ऐवजी, आरोग्य शिबिरातून वाहली श्रद्धांजली, रोहित निकुरे यांचा पुढाकार

तेरवीच्या कार्यक्रमा ऐवजी, आरोग्य शिबिरातून वाहली श्रद्धांजली, रोहित निकुरे यांचा पुढाकार

मूल प्रतिनीधी

आई-वडिलांनी घडविलेल्या संस्काराच्या भरोशावर अनेक मुलं - मुली आकाशाला गवसणी घातली असली तरी आई-वडिलांचे म्हातारपण वृद्धाश्रमात घालवणारी तर दुसरीकडे आई-वडिलांच्या संस्काराची जाण ठेवून त्यांच्या जिवंतपणनीच त्यांची सेवा करत मरणोत्तरही त्यांच्या नावाने सामाजिक कार्य करित सामाजिक रुण फेडणाऱ्यांची संख्या समाजात कमी नाही.

मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील रहिवाशी व पोस्ट मास्तर असलेले रमेश केशव निकुरे (६२) यांचे ८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे सामाजिक रिती रीवाजाने त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम होने अपेक्षित होते. मात्र त्यांचा मुलगा सामाजिक कार्यकर्ते, सोनेरी ध्येय बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रोहित निकुरे यांनी तेरवीचा कार्यक्रम न घेता गडिसुर्ला व परिसरातील नागरिकांना आरोग्य शिबिराचा लाभ घेता यावा म्हणून त्यांनी रविवारला आरोग्य शिबिराचे आयोजन करून वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आरोग्य शिबिरात ७०० नागरिकांनी सहभाग नोंदविला. शिबीरात रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले. शिबिरात चंद्रपुरातील नामवंत डॉक्टरांची चम्मू उपस्थित होती. यात प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे, पॅथॉलॉजिस्ट डॉ. राकेश गावतुरे, फिजिशियन डॉ तिरथ ऊराडे, सर्जन डॉ.रुपेश सोनडवले, डॉ. अनिकेत बालकुटे, त्वचारोग तज्ञ डॉ. अमेय झरकर, जनरल फिजिशियन डॉ. विवेक यजजलवार, जनरल फिजिशियन डॉ. दीपक जोगदंड आदी वैद्यकीय चम्मू उपस्थित होते. रोहित निकुरे यांनी घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments