Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

संघटनेत नकारात्मकतेला स्थान नसते : विजय भोगेकर, पुरोगामी शिक्षक संघटनेची त्रैमासिक सभा संपन्न

संघटनेत नकारात्मकतेला स्थान नसते : विजय भोगेकर, पुरोगामी शिक्षक संघटनेची त्रैमासिक सभा संपन्न

चंद्रपूर प्रतिनिधी
 

       महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटना , जिल्हा शाखा चंद्रपूरची त्रैमासिक सभा जनता महाविद्यालय येथे जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार , राज्यनेते विजय भोगेकर , राज्यमहिलाध्यक्ष डॉ. अल्का ठाकरे , राज्यसरचिटनिस हरीश ससनकर , मुख्य सल्लागार दीपक वऱ्हेकर , महिला अध्यक्ष विद्या खटी , महिलासरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे ,  सरचिटणीस संजय चिडे , कार्याध्यक्ष गंगाधर बोढे यांच्या उपस्थितीत पार पडली .
            सभेत संघटनात्मक दिशा ठरविण्यासाठी विविध विषयांवर साधक बाधक चर्चा करून ठराव पारित करण्यात आले . शिक्षक सहकारी पतसंस्थेत पुरोगामीचे नेतृत्व करणाऱ्या नवनिर्वाचित गडचांदूर , ब्रम्हपुरी व वरोरा येथील संचालकांना मानवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात डॉक्टरेट पदवी मिळवून पुरोगामीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या डॉ. अल्का ठाकरे यांचा गौरव व सन्मान करण्यात आला . यावेळी मंचावरून बोलताना राज्यनेते विजय भोगेकर म्हणाले , बदलती परिस्थिती व शासन धोरण यामुळे शिक्षणक्षेत्र ढवळून निघत असताना निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी संघटनेने सकारात्मकता स्वीकारून नकारात्मकतेला स्थान देऊ नये . लोकांचे विचार व्यक्तीसापेक्ष बदलत असले तरी संघटनेचे धोरण सर्वसमावेशक असायला हवेत . न्याय-अन्यायाच्या लढाईत संघटना समूहाची अंतिम आशा असते. 
           सभेसाठी जिल्हाभरातून शेकडो पुरोगामी शिलेदार उपस्थित होते . सभेचे सूत्रसंचालन लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले , ठराव वाचन आणि चर्चा सरचिटणीस संजय चिडे यांनी घडवून आणली  तर आभार कार्याध्यक्ष गंगाधर बोढे यांनी मानले .

Post a Comment

0 Comments