Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

भारत स्काऊट गाईड चळवळीचे प्रणेते लार्ड बेडन पावेल यांची जयंती नवभारत विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरी

भारत स्काऊट गाईड चळवळीचे प्रणेते लार्ड बेडन पावेल यांची जयंती नवभारत विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरी

मूल प्रतिनिधी

लार्ड बेडन पावेल यांच्या जयंतीनिमित्त नवभारत विद्यालयात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला.. तसेच भारत स्काऊट गाईडचा  इतिहासाचा विद्यार्थांना परिचय देण्यात आला. त्यानंतर गाईड शिक्षिका सौ.व्ही.एस भांडारकर मॅडम *दया कर दान भक्तिका हमे परमात्मा देना* ...ही प्रार्थना म्हणताना.....ह्या प्रार्थनेने साऱ्या  परिसरात शांतता व प्रेमभावना दाटून आल्या... त्यानंतर *वुई शाॅल ओव्हर कम हे देशभक्तीपर गीत* म्हणण्यात आले... तेव्हा विद्यार्थांच्या देशभक्तीपर भावना उचंबळून आल्या.
त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री ए.एच.झाडे सरांनी गाईड पथकाला *शिस्तीचं महत्व* सांगितले...
असा हा विविधरंगी सुंदर उपक्रम घेण्यात आला...
सदर उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.ए.एच.झाडे सर, शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती राजमलवार मॅडम तसेच गाईड शिक्षिका सौ.व्ही.एस.भांडारकर मॅडम,जेष्ठ शिक्षक श्री.मुंडरे सर,श्री.डांगरे सर,श्री.गुरुदास चौधरी सर,श्री.माथनकर, श्री,पुपलवार सर,श्री बोंडे सर, विज्ञान शिक्षक श्री.वाळके सर,कु.उमक मॅडम,कु.गोंगल मॅडम,कु.तलांडे मॅडम तसेच कला शिक्षक श्री.सलाम सर, तसेच श्री.निमसरकर सर,श्री.सुनिल चौधरी सर, इ.शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments