Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

गाईड पथकांनी खरी कमाईतून केले रुग्णांना फळ वाटप #fruits#patients

गाईड पथकांनी खरी कमाईतून केले रुग्णांना फळ वाटप

Guide teams distribute fruits to patients from actual earnings


मूल प्रतिनिधी

मूल शहरांतील नवभारत विद्यालय येथील गाईड शिक्षिका वर्षा भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाईड पथकांनी उपजिल्हा रुग्णालय मूल येथील सर्व रुग्णांना व गरजु लोकांना सेप व केळ ही फळ वाटप केली.

गाईड पथकांना समाजसेवा कळावी, दुसऱ्यांच्या आनंदात आपले सुख दडले असते याची जाणीव व्हावी या सामाजिक हेतूने गाईड पथकाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका वर्षा भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना फळे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची केलेली खरी कमाई यातून हा उपक्रम करण्यात आला.

ह्या खऱ्या कमाईचा योग्य उपयोग करतांना वेगळाच आनंद मिळाला. तसेच दुसऱ्यांना आनंद देण्यातच आपल्याला आनंद मिळतो हे समजले. समाजसेवेतच खरं सुख आहे, ह्याची जाणीव यावेळी झाली.

Post a Comment

0 Comments