Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विवेकानंद विद्याभवन अड्याळ जिल्हा भंडारा येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा थाटात संपन्न

विवेकानंद विद्याभवन अड्याळ जिल्हा भंडारा येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा थाटात संपन्न

मूल प्रतिनिधी

विवेकानंद विद्याभवन अड्याळ ता. पवनी जि. भंडारा च्या माजी विद्यार्थ्यांचा  ईयत्ता पाचवी ते दहावी (सन १९८२ ते १९८८) बॅचचा ऐतिहासिक स्नेहमिलन सोहळा *शाळेच्या आवारातच* दि. २४/०१/२३ रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन ई.एस.आई. सी. वैद्यकीय महाविद्यालय, अलवर, राजस्थान येथील सुक्ष्मजिवशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. पवन उके ह्यांनी वरील उद्दगार काढले. ते पुढे म्हणाले की अत्यंत कठीण, प्रतिकूल परिस्थितीत कसे सुखाने जगायचे ते ह्या शाळेमध्ये मी शिकलो. विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे महत्त्व जाणुन जोमाने अभ्यास करुन बोर्डात पहिले स्थान मिळवावे.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. या कार्यक्रमात बरोबर शिकत असलेले दिवंगत विद्यार्थी आणि दिवंगत शिक्षक ह्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
स्नेहमिलनाचे उद्घाटन करतांना विवेकानंद विद्याभवन व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.
एस. जगनाडे ह्यांनी होत असलेल्या स्नेहमिलना बाबद आनंद व्यक्त केला व माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या अपेक्ष्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आणि शाळेच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
 प्रमुख पाहुणे डॉ. भूमेंद्र भोंगाडे, प्राध्यापक व प्रमुख pharmaceutical chemistry, RAK विद्यापीठ, U.A.E. म्हणाले की माजी विद्यार्थ्याची संघटना स्थापन करुन नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे आणि भविष्यात त्यांना मदत करावी.
नगरपरिषद गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय भंडाराचे प्राध्यापक नारायण जुवार म्हणाले की कोणतेही काम विचारपूर्वक करावे आणि शक्तीपेक्षा युक्ती वापरावी. ज्योतिबा माध्यमिक विद्यालय नागपूरच्या सहायक शिक्षिका सुनंदा टेंभुर्ने (राऊत) ह्यांनी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी ध्येये निश्चित करायला सांगितले व ते साध्य करण्यासाठी मेहनत घ्यायला सांगितले. नवोदय विद्यालय सेलुकाटा वर्धा चे सहायक अध्यापक उमेश टेंभुर्ने ह्यांनी इयत्ता सहावी साठी नवोदय परीक्षा निवड चाचणी तसेच नवोदय शिक्षक भरती बाबद मार्गदर्शन केले.
विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद अखिल भारतीय विदर्भ प्रदेश अध्यक्ष किशोर सायगण ह्यांनी ३५ वर्षानंतर पहिल्यांदा होत असलेल्या ऐतिहासिक स्नेहमिलनाच्या सुवर्णयोगी सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला.टोलेवाही चंद्रपूर येथील पोलीस पाटील संगीता पोटवार (छल्लावार) म्हणाल्या की आनंदाचे क्षण पुन्हा जगु या, जुन्या आठवणींना जागवू या, शाळेच्या अंगणात फुलवलेली ती मौजमजा, आज पुन्हा अनुभवु या, चला मित्रांच्या घोळक्यात हरवुन जाऊ या.
प्रास्तविकात विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक सैंग कोहपरे ह्यांनी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना व त्याची उद्दिष्ट ह्यावर प्रकाश टाकला त्याचप्रमाणे शाळेचे ब्रीद *परिश्रमातून जीवन आणि विवेकातुन आनंद* ह्याप्रमाणे शाळा कार्य करीत आहे व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध आहे असे सांगितले. संजय ब्राह्मणकर ह्यांनी आपल्या मधुर आवाजाने संचालन केले तसेच संदीप अंबादे ह्यांनी आभार प्रदर्शन केले.
नारायणा विद्यालय नागपुर येथे आठवीत शिकत असणाऱ्या गार्गी पवन उके ह्यांनी उद्घोषणा केली की ज्यांना येत्या दहावीच्या परीक्षेत गणित आणि मराठी ह्या विषयात ९५% गुण मिळतील त्यांना रोख दहा हजार बक्षीस आणि श्रद्धा पवन उके मेमोरियल ट्रस्ट द्वारे प्रमाणपत्र देण्यात येतील. विवेकानंद विद्याभवन कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थिनी अमावस्या गजभिये, समीक्षा ठवकर, आकांशा तुंबडे, श्रद्धा ठवकर ह्यांनी स्वागतगीत सादर करुन पाहुण्याचे स्वागत केले. 

  *विवेकानंद विद्याभवन अड्याळच्या इतिहासात आजपर्यंत कुठल्याही माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम घेतलेला नाही* सर्वांच्या चेहऱ्यावर ३५ वर्षानंतर (तीन दशकांनंतर) भेटल्याचा आनंद अमर्याद होता. विखुरलेले विद्यार्थी पुन्हा एकदा सोबत आल्याचा सुवर्ण योग घडुन आला होता.
 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सैंग, संदीप, संजय,किशोर, सीमा, सुनंदा,पवन, नारायण, राजु,संगीता, चिमणकर, माया ह्यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने
उमेश टेभुंर्णे ,प्रशांत बोदेले,संजय ब्राम्हणकर,सैंग कोहपरे, संदीप अंबादे,पवन उके, सुनंदा टेंभुर्ने,  नारायण जुवार, भूमेंद्र भोंगाडे, संगीता पोट्वार,  देवानंद शिंगाडे,बबन ढवळे, मिना वाडेकर, मंदा शहारे , सौंद्रा ढवळे ,पुस्तकला शिंगाडे ,महादेव गिरडकर, मनोहर काकडे, राजेश रोहनकर, मंदा मुंगाटे, प्रयाग गजभिये, रंजना रेहपाडे, चंदा राऊत, रजनी शहारे, सुगंधा जूवार, सीमा लाडे, सुरेश जाधव, विठ्ठल आखरे, जनार्दन नान्हे, रमेश कोल्हे, विजय कावडे, प्रल्हाद नगरे, भगवान बोरकर, मनोज रामटेके, धनराज मोहुरले, सुरेश कुबडे, प्रकाश वर्टी इत्यादी सर्व मित्र मैत्रिनीआवर्जुन उपस्थित  होते. तसेच विवेकानंद विद्याभवन व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच वर्ग ५ते १२ चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments