Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी महिला जखमी, मोरवाही येथिल घटना

अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी महिला जखमी, मोरवाही येथिल घटना

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील मोरवाही येथे अस्वलिने महिलेवर हल्ला करुन जखमी केल्याची घटना आज सकाळी घडली. देवकाबाई पत्रुजी झरकर राहणार मोरवाही असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. जखमी महिलेला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.

देवकाबाई ही स्वतःच्या शेतात लाख खोदायला गेली होती. लाख खोदत असताना शेतात दडून असलेल्या अस्वलीने देवकाबाई वर हल्ला करून गंभिर जखमी केले आहे. शेतात असलेल्या इतर महिलांनी आरडाओरड केल्याने अस्वल पळाली. 

जखमी झालेल्या महिलेला रूग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुमित समर्थ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भेट दिली.
जंगली प्राण्यांचे शेतकऱ्यांवर वारंवार हल्ले होत असल्याने समर्थ यांनी वनविभागावर रोष व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments