Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल तालुक्यातील सुशी येथे पार पडला पहिला सत्य शोधक विवाह सोहळा

मूल तालुक्यातील सुशी येथे पार पडला पहिला सत्य शोधक विवाह सोहळा 

मूल प्रतिनिधी
 

मूल तालुक्यातील पंचायत समिती च्या माजी सदस्या सौ .वर्षाताई राजेंद्र लोनबले यांचा मुलगा सत्य शोधक अक्षय राह.चिरोली व सौ.कांताताई विलास ठाकरे राह.सुशी ता.मूल जिल्हा चंद्रपुर यांची मुलगी  सत्य शोधीका  पोर्णिमा यांचा विवाह मुलीचे मामा बंडू शंकरराव गुरूनुले राह.सुशी यांच्या घरी  आज दि. 10/2/2023 रोजी संपन्न झाले.
सर्व प्रथम दिप प्रज्वलन करून  तात्या साहेब महात्मा फुले आंणि सावित्रीआई फूले यांचे प्रतिमांना पुष्पहार अर्पन करून वंदना घेऊन वधू व वर यांचे आई वडील यांना पुस्तके देवून स्वागत करण्यात आले, विवाहानंतर उभयंताना गडचिरोली जिल्हा माळी समाज सेवा संघाचे प्रभारी व सामाजिक कार्यकर्ते सुनिल भाऊ कावळे व मनोज सोनूले यांचे कडून अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अॅड. राजेंद्र महाडोळे यांचे हस्ते प्रमाण पत्र देण्यात आले 

अक्षय आणि पोर्णिमा यांनी समाजातील पारंपारिक प्रथा कर्मकांड यांना फाटा देत क्रांति सुर्य तात्यासाहेब महात्मा फुले आणि क्रांति ज्योती सावित्रीआई फुले यांचे विचारांचा आदर्श घेऊन समाजाला नवी दिशा दिली त्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

सत्य शोधक विवाह विधी कर्ते, सत्य शोधक विचार वंत सुनिल कावळे व मनोज सोनूले (आमगाव) चामोरशि जिल्हा गडचिरोली यांनी पार पाडली 

मूल क्रांति ज्योत सेवा संघाचे अध्यक्ष, ईश्वर लोनबले व सामाजिक कार्यकर्ते नंदू  बारस्कर   युवा कार्यकर्ता  ओमदेव मोहूले यांच्या मार्गदर्शनाखाली  पार पडले 
या प्रसंगी उपस्थित अ.भा. माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अॅड. राजेंद्र महाडोळे,जि.प माजी अध्यक्षा संध्या ताई गुरूनुले, जेष्ठ नेते दिपक पाटील वाढई सामाजिक कार्यकर्ते डाॅ. गजानन चौधरी, गुरू भेंडारे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अमोल गुरूनुले, राजेंद्र मांदाळे, नाकतोडे साहेब, संजय चौधरी, प्रदिप वाढई येजगाव, राजेंद्र वाढई  अनिल शेंडे, संजय आवळे, उषा शेंडे,  सौरभ वाढई, टेकाडीचे सरपंच सतीश चौधरी गुलाब शेंडे,विठ्ठल इंगोले, पोंभूरणा येथील सामाजिक कार्यकर्ते भुजंग ढोले,आप्त परीवार, मित्र परीवार,इत्यादी  समाज बांधव शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments