Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विदर्भ बारई समाज मकरसंक्रांत स्नेहमीलन सोहळा संपन्न

विदर्भ बारई समाज मकरसंक्रांत स्नेहमीलन सोहळा संपन्न

मूल प्रतिनिधी
 

बारई समाज संघटनेचा मकरसंक्राती स्नेहमीलन सोहळा मूल येथे सम्पन्न झाला. समाज बांधवांचे संघटन व्हावे, महिलांना व्यक्तिमत्त्व विकासाचे व वैचारिक देवाण घेवाणीचे व्यासपीठ मिळावे या हेतूने मागील 2012 पासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

ह्यावर्षी हा कार्यक्रम श्री . संदीप विलासराव भांदककर मूल यांचे कडे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ. छायाताई रोकडे (अर्जुनी मोरगाव) यांनी भूषविले तर उपाध्यक्ष स्थानी सौ. सविताताई झुरमुरे ह्या होत्या, कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ .संध्या कवासे यांनी केले तर संचालन कु. शृंखल संदीप भांदककर हीने अतीशय सुरेख पद्धतीने केले.

कार्यक्रमात बोलताना वक्त्यांनी बारई समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता आहे, समाजाचे संघटन महत्वाचे आहे यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले त्याचप्रमाणें महिलांना वैचारिक देवाणघेवाण करता यावी, मुलांना आपल्या कला गुणांचे प्रदर्शन करता यावे या दृष्टिकोनातून विविध स्पर्धा घेण्यात आल्या. संपूर्ण समाज बांधवांचे सुरुची भोजनाची व्यवस्था संदीप भांदककर यांनी केली .

कार्यक्रमाचे यशस्वीते करीता सौ. मनीषा सिरस्कर, सौ .माधुरी कोरेकर, सौ. निकिता झुरमुरे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमला मूल मधील संपूर्ण समाज बांधवांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments