Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

गोडाऊन कोसळल्याने धान मालकाचे मोठे आर्थिक नुकसान

गोडाऊन कोसळल्याने धान मालकाचे मोठे आर्थिक नुकसान 

मूल प्रतिनिधी


मूल शहरातील चामोर्शी रोड वर असलेल्या गोडाऊन अचानक कोसळल्याची घटना आज घडली. गोडाऊन मध्ये एस एन एस राईस मिल चे मालक महेश चिताडे यांच्या मालकीचे धानाचे पोते ठेवण्यात आले होते. या घटनेमुळे गोडाऊन मालक सुनिल गोयल आणि एसएनएस चे मालक महेश चिताडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मूल शहरातील चामोर्शी रोडवर सुनिल गोयल यांच्या मालकीचे गोडाऊन आहे. गोयल यांच्या गोडाऊन मध्ये एस एन एस राईस मिल चे मालक महेश चिताडे यांचे धान साठवून ठेवण्यात आले होते.

आज दुपारच्या सुमारास अचानक गोडाऊनची भिंत कोसळल्याने गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेले धान्याचे पोते आणि धान अस्ताव्यस्त पसरल्याने संपूर्ण धानाची मोठी नासाडी झाली असून धान मालकाचे अंदाजे 25 लाखाचे नुकसान झाल्याचे कळते.

Post a Comment

0 Comments