Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सावित्रीबाई फुले च्या विचारातून समाजाला दिशा मिळेल - डॉ. अभिलाषा गावतुरे

सावित्रीबाई फुले च्या विचारातून समाजाला दिशा मिळेल - डॉ. अभिलाषा गावतुरे

मूल प्रतिनीधी

संपूर्ण विश्व सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत आहे. जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुलेंचे विचार सर्वांपर्यंत जावे. त्या विचारातून समाज जागृती व्हावी. समाज जागृती मधून आपल्यासमोर काय आव्हाने आहेत काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा परत उहापोह व्हावा, त्यातून आपल्याला कुठले बदल हवे आहेत. सावित्रीबाई फुलेंना कुठल्या प्रकारची व्यवस्था अपेक्षित होती? कसा भारत अपेक्षित होता. याबद्दल सुद्धा जागृती व्हावी. सावित्रीबाई फुले यांच्या विचारातून जयंतीच्या निमित्ताने नक्कीच समाजाला एक दिशा मिळेल अशी अपेक्षा मूल येथील कार्यक्रमात ओबीसी नेत्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी व्यक्त केले.

मूल शहरातील वॉर्ड नंबर १ आणि वॉर्ड नंबर २ येथील माळी समाजाच्या युवकांनी महात्मा फुले चौकात शिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माझ्यावर पण करून अभिवादन करण्यात आले.

महात्मा फुले चौकात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी डॉ. अभिलाषा गावतुरे होत्या. प्रमुख अतिथी स्थानी मूल नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोणबले, पब्लिक पंचनामाचे संपादक विजय सिद्धावार, डेव्हिड खोब्रागडे आदी पाहुणे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनावर प्रकाश टाकला. 

कार्यक्रमाचे संचालन व आभार ओमदेव मोहूर्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कार्यकर्ते राकेश मोहूर्ले, संदीप मोहूर्ले आदी कऱ्यकर्त्यांनी विषेश परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला पुरुष, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments