Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

घर जळालेल्या पीडिताला मदतीचा हात

घर जळालेल्या पीडिताला मदतीचा हात

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील बेंबाळ येथील अमोल मुरलीधर पगडपल्लिवार यांचे घर शॉर्टसर्किट मुळे जळाल्याची घटना गुरुवार ला घडली होती. या घटनेत संपूर्ण घरगुती साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
अशा संकट परिस्थितीत पगडपल्लिवार यांना गावातील नागरिकांनी आलमारी, ब्लँकेट, कपडे आणि घरगुती साहित्य देऊन मदतीचा हात दिला आहे.

यावेळी माजी उपसरपंच पांडु कंकलवार, माजी उपसरपंच मुन्ना कोटगले, गुरुदास राऊत, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत गोहणे, शीला कंकलवार प्रतिभा भडके, किशोर उरकुंडवार, नविन ध्यानबोईवार, नितेश जिल्हेवार, राकेश दयालवार , अजित योरोजवार गोविंदा कोम्मावार, शामराव आऊलवार, दिलीप जिल्लपेललीवार, कार्तिक जिल्हेवार, पोचू आऊलवार, पोचू जिल्हेवार, अशोक बावणे, रवी कंकलवार आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments