Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

हिरव्या रानातही मी पर्णहीन झालो

हिरव्या रानातही मी पर्णहीन झालो

हिरव्या रानातही मी पर्णहीन झालो,
सगळे सोबत असूनही मी छिन विच्छींन झालो....

होते योवन माझे किती फुललेले,
पर्णiनी वाऱ्यासोबत गीत गात झुललेले....

पर्णावीन माझ्यात शोभाch उरली नाही,
कधी आरवायचा राघू इथे,
आज पाखरू ही भरकटत नाही...

पालवी साठी निराश का होऊ,
का उद्याची पहाट माझी होणार नाही ?.....

कवी - व्ही. एम . आष्टणकर

Post a Comment

0 Comments