Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बाबराळा च्या राज संदोकार ला स्वामी विवेकानंद युवा भूषण पुरस्कार जाहीर

बाबराळा च्या राज संदोकार ला स्वामी विवेकानंद युवा भूषण पुरस्कार जाहीर

मूल प्रतिनिधी

चंद्रपूर कला फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हास्यकवी प्रशांत दामले यांनी स्वामी विवेकानंद युवा भूषण पुरस्काराकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील बाबराळा या खेडेगावातील युवा कवी राज परशुराम संदोकार यांची नुकतीच निवड केली आहे.

कला फाउंडेशन सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी आरोग्य, कला, क्रीडा, अभिनय, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता आदी क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. या वर्षी देखील

कला फाउंडेशनच्या वतीने पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. राज संदोकार यांच्या साहित्याचे कौतुक व्हावे म्हणून अंगुलीमाल मायाबाई उराडे व अनुराग गोवर्धन यांनी राज संदोकार यांच्या कार्याची शिफारस कला फाउंडेशनकडे केली होती. 

राज संदोकार यांच्या साहित्याची दखल घेऊन अध्यक्ष हास्यकवी प्रशांत दामले यांनी राज संदोकार यांना यावर्षीचा स्वामी विवेकानंद युवा भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. राज संदोकार यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments