Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नवभारत विद्यालय मूल येथे उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार सोहळा

नवभारत विद्यालय मूल येथे उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार सोहळा

मूल प्रतिनिधी
 

नवभारत विद्यालय मूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, एम.सी.व्ही.सी ,कलाविष्कार 2023 वार्षिक स्नेहमिलन तर्फे उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला...
यासाठी शाळा, महाविद्याल यातून नऊ लोकांची निवड करण्यात येऊन त्यांचा शाळेतील मंत्रीमंडळाच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
1.शैक्षणिक कार्यासाठी एम.सी.व्ही.सी.प्राध्यापक श्री. वासाडे सरांचा
 सत्कार शालेय मुख्यमंत्री नागेश्वर कंकलवार या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
 2. जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणारे....कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री कातकर सरांचा सत्कार शाळेतील विद्यार्थी शिव शेंडे च्या हस्ते करण्यात आला.
3.पत्रकारिता,विद्यालयातील कार्यक्रम प्रसिद्धी करिता.एम.सी.व्ही.सी.प्राध्यापकश्री पानसे सरांचा सत्कार विनीत वाकडे ह्या विद्यार्थ्याच्या हस्ते करण्यात आला.
4. विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठीविद्यार्थांना मार्गदर्शनासाठी.न.भा.वि.मूल येथील जेष्ठ शिक्षक श्री.चौधरी सरांचा सत्कार घनश्याम भाकरे या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
5.एन.सी.सी.पथकात उत्कृष्ट कामगिरीबद्दल..न.भा.वि.मूल येथील श्री मोडक सरांचा सत्कार प्रिन्स सातपैसे या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
6.विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शनासाठी.न.भा.वि.मूल येथील श्री. वाळके सरांचा सत्कार वैभव कावळे या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
7. पर्यावरण संवर्धनासाठी तसेच पर्यावरण दूत म्हणून नगरपरिषदेकडून निवड झाल्याबद्दल न.भा.वि.मूल येथील जेष्ठ शिक्षिका सौ.भांडारकर मॅडम यांचा सत्कार दिपाली फाले या विद्यार्थीनीच्या हस्ते करण्यात आला.
8.  उत्कृष्ट चित्रकारिता व विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शनासाठी न.भा.वि.मूल येथील कलाशिक्षक श्री.सलाम सरांचा सत्कार ओम लांजेवार या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
9.स्त्रीशक्ती चा सन्मान .न.भा.वि.मूल.येथील कर्मचारी श्रीमती नीता ताई कारगीरवार यांचा सत्कार साक्षी मेश्राम या विद्यार्थीनीच्या हस्ते करण्यात आला.
वरील नऊ व्यक्तीचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला...
सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.ए.एच झाडे सर उपस्थित होते.तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती राजमलवार मॅडम व सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तलांडे मॅडमनी केले..तर आभार प्रदर्शन श्री.मुंडरे सरांनी केले..
आनंदमय व भावना पूर्ण वातावरणात हा सत्कार सोहळा संपन्न झाला..

Post a Comment

0 Comments