Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

समाजाची लोकसंख्या लक्षात घेवुन राजकीय पक्षांनी तेली समाजाला संधी द्यावी आ.अँड.अभिजीत वंजारी

समाजाची लोकसंख्या लक्षात घेवुन राजकीय पक्षांनी तेली समाजाला संधी द्यावी
आ.अँड.अभिजीत वंजारी

मूल प्रतिनिधी
 

समाजाची लोकसंख्या लक्षात घेवुन प्रमुख राजकीय पक्षांनी समाजाला त्या त्या क्षेत्रात प्रतिनिधीत्व द्यायला पाहीजे, परंतु राजकीय क्षेत्रात बहुसंख्येने असलेल्या तेली समाजाला पाहीजे त्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिल्या जात नाही, अशी खंत व्यक्त करतांना कौटुंबिक जबाबदारी सांभाळून युवकांनी समाजकारणासोबतचं राजकीय क्षेत्रात संधी शोधली पाहीजे. असे मत आ. अँड. अभिजीत वंजारी यांनी व्यक्त केले. 
     विदर्भ तेली समाज महासंघ शाखा मूलच्या वतीने आयोजित संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जयंती, समाज प्रबोधन व गुणगौरव सोहळ्यात आ. अँड.अभिजीत वंजारी बोलत होते.
      वर्तमान व भविष्यकाळ स्पर्धेचा राहणार असल्याने विद्यार्थ्यांनी भविष्यातील आव्हाणे आणि ध्येय समोर ठेवुन मार्गक्रमण करावे. असा सल्ला देतांना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची  तयारी करण्यास मदत होण्यासाठी क्षेत्रातील सार्वजनिक वाचनालयाकरीता दोन लाख रूपयाचे स्पर्धा परीक्षेचे पुस्तक उपलब्ध करून देण्याचे आ. अभिजीत वंजारी यांनी जाहीर केले.
      स्थानिक कर्मवीर कन्नमवार सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुर्यकांत खनके होते. यावेळी समाजभुषण बबनराव फंड, रघुनाथ शेंडे, माजी आमदार देवराव भांडेकर, अमरावती विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव उल्हास नरड, हृदयरोग तज्ञ डाँ. विश्वास झाडे, महीला जिल्हाध्यक्ष मिनाक्षी गुजरकर, विदर्भ उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ ब्रम्हपुरीचे अध्यक्ष डाँ. सतीश कावळे, पोंभुर्णाच्या नगराध्यक्ष सुलभा पिपरे, सामाजिक कार्यकर्ते डाँ. रामचंद्र दांडेकर, बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनुरकर आदी उपस्थित होते.
      संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन व अभिवादनाने सोहळ्याची सुरूवात झाली. महासंघाचे जिल्हा महासचिव गंगाधर कुनघाडकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बाबुरावजी कोहळे, डाँ. सतिश कावळे, मिनाक्षी गुजरकर, माजी आमदार देवराव भांडेकर, बबनराव फंड आणि रघुनाथ शेंडे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी डाँ. विश्वास झाडे यांनी हृदयरोग आणि उपाय यावर तर अमरावती विभागीय सचिव उल्हास नरड यांनी शैक्षणिक व व्यक्तीमत्व विकासावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. प्राचार्य सुर्यकांत खनके यांच्या अध्यक्षीय भाषणाने सोहळ्याची सांगता झाली. 
    सोहळ्यात समाजातील गुणवंत विद्यार्थी, आजी व माजी मुख्याध्यापक, सरपंच, उपसरपंच वा माजी नगरसेवक, सेवानिवृत्त अधिकारी, ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्त्यांचा आ. अभिजीत वंजारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. आयोजकांच्या वतीने आ. अभिजीत वंजारी यांचे सह उपस्थित मान्यवरांचा सन्मान चिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. 
    सोहळ्याचे निमित्ताने समाजाच्या जागेवरून कन्नमवार सभागृहा पर्यंत श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन लक्ष्मण खोब्रागडे यांनी तर माजी नगर सेवक महेंद्र करकाडे यांनी आभार मानले. सोहळा यशस्वीतेसाठी कैलास चलाख, राजेश सावरकर, दादाजी येरणे, अतुल सातपैसे, चेतना येनुरकर, अनिल साखरकर, विनोद आंबटकर, गणेश कावळे, प्रशांत भरडकर, सविता कावळे, अल्का कामडी आदींनी परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments