Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वनविभाग व शासनाचे विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, सुमित समर्थ यांचे नेतृत्व

वनविभाग व शासनाचे विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, सुमित समर्थ यांचे नेतृत्व 

मूल प्रतिनिधी

मूल येथे  वन्य प्राण्यांमुळे होत असलेल्या  वारंवार त्रासामुळे वनविभाग तथा शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य ,   राष्ट्रवादी किसान सेल चे अध्यक्ष तथा ओबीसी नेते जगदीश जूनघरी ,  चंद्रपूरचे माजी नगरसेवक राजेंद्र आखरे ह्यांच्या उपस्थितीत  बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी   सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांच्या  नेतृत्वात  ठीय्या आंदोलन   गांधी चौक मूल येथे  भव्य स्वरूपात आयोजित  करण्यात आले ! 
       सदर आंदोलनात सुमारे  2000 च्या वर उपस्थिती दर्शवून शेतकरी बांधवांनी राज्य सरकारच्या विरोधात बहुसंख्येने रोष दर्शवून निषेध करण्यात आला ! 
        सदर आंदोलनात सुमीत समर्थ  ह्यांनी राज्य सरकारच्या  व वनविभागाच्या निष्काळजी पणामुळे वन्यप्राण्यांच्या व्यवस्थापनाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून  संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व  शेतमजूर ह्यांच्यावर उपासमारीची पाळी आणलेली आहे असे प्रतिपादन करून  महाराष्ट्र सरकारवर कडाडून टीका केली ! 
         वनविभागाच्या निष्क्रिय व हिटलरशाही पणा मुळे  होत असलेल्या   वन्यप्राण्यांमुळे   समस्त गावकऱ्यांना होत असलेल्या अडचणी  राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा देशाचे नेते  आदरणीय शरदचंद्रजी पवार व खासदार सुप्रिया ताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  विरोधीपक्ष नेते अजित पवार ह्यांच्यापर्यंत नक्की पोहचवून मूल तालुक्यातील  सर्व शेतकरी बांधवाना व समस्त जनतेला  न्याय मिळवून देण्याकरिता सदैव प्रयत्न करीन असे आश्वासन दिले !
       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच  फक्त जनतेला न्याय मिळवून देऊ शकते असा विश्वास सुमीत समर्थ ह्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दर्शविला !
     ह्यासोबत  राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ  राष्ट्रवादी काँग्रेस  किसान सेल चे अध्यक्ष  जगदिश जूनघरी, तालुका अध्यक्ष किसन वासाडे , शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे , ह्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तसेच सर्व  उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  वनविभागाच्या विरोधात निदर्शने देऊन गांधी चौक ते तहसील कार्यालय पर्यंत पदयात्रा काढून ढोल - ताशा चा  भव्य डपरा समूहाच्या आवाजात  परतवाघ रुपधारण करून देखावा  ह्यांचे  रॅली व महाराष्ट्र सरकार च्या विरोधात एक अनोख्या भव्य उपस्थितीत   निदर्शने देऊन तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले  ! 
      सरकारने  शेतकऱ्यांच्या मागणीवर लाफरवाही केल्यास व संबंधीत  विभागासोबत बैठक  न लावल्यास  सदर आंदोलन पुन्हा  ह्यापेक्षा भव्य स्वरूपात तीव्र आंदोलन घेण्याचा ईशारा सुद्धा देण्यात आला  !
       सदर आंदोलन यशस्वी  होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष किसन वासाडे , शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे , तालुका महिला अध्यक्ष नीता गेडाम , शहर महिला अध्यक्ष सौ अर्चना चावरे, युवक तालुकाध्यक्ष समीर अल्लूरवार , शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे,  युवा नेते बंडू साकलवार , प्रा.प्रभाकर धोटे , नंदू बारस्कर अनिकेत मारकवार , शहर उपाध्यक्ष दुष्यांत महाडोळे तालुका सचिव ज्ञानेश्वर वाघमारे , विकास गुरनुले ,  अजय त्रिपत्तीवार , नंदू बारस्कर प्रभाकर धोटे , हेमंत सुपणार ,  , लाला साळवे ,  शुभम शेंडे  , नवनीत चिंचोलकर  , मारोती शेंडे,  मंगल मशाखेत्री ,   साई पेंदोर ,रोहिदास वाढई,  सतीश गुरनुले , सुरेश शिंदे ,  संदीप तेलंग ,बालाजी लेनगुरे ,राहुल तोटावार , संध्या निकुरे , जयश्री झरकर ,  विपुल ठिकरे,  गिरीधर उईके , किशोर खंडाळे , देवा भुरसे , नंदकिशोर गुरनुले , साई पेंदोर , गणेश गायकवाड , सुरेश गावतुरे , विनायक निकोडे  दिनेश कोल्हटवार ,दिवाकर चौधरी  , लालचंद मेश्राम , आदी बहुसंख्य पदाधिकारी हजारो च्या संख्येने जणआंदोलन स्वइच्छेने रॅलीत सहभागी होते !

Post a Comment

0 Comments