Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल नगर परिषद अंतर्गत "नयी चेतना पहल बदल की" राष्ट्रीय मोहीम

मूल नगर परिषद अंतर्गत "नयी चेतना पहल बदल की" राष्ट्रीय मोहीम 

मूल प्रतिनिधी

दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान (DAY-NULM) नगर परिषद मुल अंतर्गत मा.मुख्याधिकारी श्री अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री रितेश भोयर सहायक प्रकल्प अधिकारी यांच्या उपस्थितीत “नयी चेतना :पहल बदल की” नावाची लिंग आधारीत भेदभाव दूर करण्यासाठी राष्ट्रीय Gender मोहिम राबविण्याचे ठरविण्यात आले. या मोहिमेची थिम ‘लिंग आधारित हिंसा समाप्त् करणे अशी आहे, त्या दृष्टीने राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान (DAY-NULM) नगर परिषद मुल व NRLM यांच्या समन्वयाने ULB व CLF/ALF/SHG यांच्या स्तरावर विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.
         त्यादृष्टीने लिंग आधारित हिंसेबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली, सोशल मिडीयावर नियमीत लिंग आधारित हिंसेबाबत जनजागृती करण्यात आली, बचत गटातील महिलांची या मोहीमे बाबत सायंकाळी मेणबत्ती घेवुन रॅली व्दारे जनजागéती करण्यात आली अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला यशस्वी करण्याकरीता श्री विनोद येनुरकर प्रशासकीय अधिकारी न.प.मुल तसेच सौ नलिनी आडपवार प्ररीका नगर परिषद मुल व बचत गटातील महिलांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments