Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सुभाष नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

सुभाष नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

मूल प्रतिनिधी

सुभाष नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनी सकाळी झेंडावंदन करण्यात आले. झेंडावंदन स्थानिक रहिवासी माजी सैनिक मारुती कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधुरी ताई करकाडे, उपाध्यक्ष राहुल प्रेमलवार,  माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, बंडू रामगिरवार, दीपक बोर्डावार, सामाजिक कार्यकर्ते उमेश खोब्रागडे, गिरडकर, अतुल मडावी, सारिका रेगुलवार, संगीता गुंतीवार, शाळेचे मुख्याध्यापक खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक के.टी खोब्रागडे तर आभार सहाय्यक शिक्षिका डी. एस भडके यांनी मानले.

शाळेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. त्यानंतर देशभक्तीपर व पारंपरिक गीतांवर समूह नृत्य सादर करण्यात आले. 

यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शाळेच्या परिसरातील नागरिक पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments