Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बिहारच्या धरतीवर महाराष्ट्र सरकारने ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी — प्रा.विजय लोनबले

बिहारच्या धरतीवर महाराष्ट्र सरकारने ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी — प्रा.विजय लोनबले

मूल प्रतिनिधी

 

बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्र‎ राज्यातील इतर मागासवर्गीयांची‎ स्वतंत्र जनगणना करण्यात यावी,‎ अशी मागणी अखिल भारतीय‎ महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रा.विजय लोनबले यांनी केली आहे. तसे विनेदनही तहसीलदार यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

नुकतेच बिहार राज्यांत स्वतंत्रपणे‎ जातीनिहाय जनगणना सुरू झाली‎ आहे. तामिळनाडू,छत्तीसगड आणि‎ अनेक इतर राज्यांनी सुद्धा ओबीसी‎ जनगणना सुरू केली आहे.‎

महाराष्ट्रातील जातीनिहाय जनगणना‎ करण्याबाबत समता परिषदेने‎ अनेकदा मागणी केली. माञ ही मागणी प्रलंबित‎ ठेवण्यात आली. जनगणना हा‎ विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे.‎ मात्र इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र‎ जनगणना करण्यासाठी केंद्र‎ सरकारने असमर्थ व्यक्त केली‎ आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने बिहार‎ सरकार प्रमाणे ओबीसींची स्वतंत्र‎ जनगणना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

निवेदन देताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, जिल्हा महिला कार्याध्यक्षा शशिकला गावतुरे,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रा.किसन वासाडे,समता परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख युवराज चावरे,समता परिषदेचे युवा कार्यकर्ते सौरभ वाढई, युवा अध्यक्ष राकेश मोहूर्ले,ओमदेव मोहूर्ले, परशुराम शेंन्डे, तालुका अध्यक्ष विक्रांत मोहूर्ले, जगदिश पाटील मोहूर्ले,प्रा.वसंत ताजणे,प्रा.गुलाब मोेरे,कैलास चलाख,चतुर मोहूर्ले,प्रा.पुरूषोत्तम कुनघाडकर,प्रा.चक्रधर घोंगडे,रूपेश निकोडे,गिरीष गुरूनुले,दुश्यात महाडोरे,प्रा.हरीष रायपूरे, निलेश रायकंठीवार,शशीकांत गणवीर,अमीत राऊत,धर्मेन्द्र सुत्रपवार,गुनेश निकुरे,काशीनाथ दासरवार, गिरीश गुरूनुले,चतूर मोहूले,सीमाताई लोनबले, शालूताई गुरूनुले,उषाताई चुधरी,सुरेखा गभणे, तसेच शेकडो समता सैनिक व ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments