Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कॉन्व्हेंट शिक्षकांना पूर्ण न्याय मिळवून देऊ--- नागो गाणार

कॉन्व्हेंट शिक्षकांना पूर्ण न्याय मिळवून देऊ--- नागो गाणार

मूल प्रतिनिधी

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या प्रचारार्थ विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल चंद्रपूर येथे श्री नागो गाणार यांनी, कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समस्यांबद्दल त्यांच्याशी संवाद साधत असताना, कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना जोपर्यंत एम इ पी एस 1981 नुसार पूर्ण लाभ सरकार द्वारे लागू होणार नाही तोपर्यंत मी आपला प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तर्फे सरकारला जॉब विचारीत राहील असे म्हटले. ते पुढे बोलताना म्हणाले की,
यापूर्वी कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना मतदानाचा अधिकार लागू नसल्यामुळे अनेक कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचारी मतदानापासून वंचित राहत होते. परंतु महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तर्फे मी राज्याचे निवडणूक आयुक्त यांच्याशी संपर्क साधून इंग्रजी माध्यम शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना मतदार नोंदणी करून घेण्याबाबत आग्रह धरला, व आज महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचारी शिक्षक मतदार संघाचे मतदार बनले आहे.
याचप्रमाणे कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पूर्ण वेतन व महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती पूर्व रजा, सी एल, इ एल, लागू करण्याकरिता आपण शासनाशी पत्रव्यवहार केला असून काही प्रमाणात अनेक कॉन्व्हेंट शाळेमध्ये तो लागू झालेला आहे. कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षकांच्या निवृत्तीनंतर त्यांना संस्थाचालक ग्रॅच्युईटीची रक्कम देत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपण सरकारकडे पाठपुरा करून ग्रॅच्युईटीची रक्कम देण्यास अनेक कॉन्व्हेंट शाळेला भाग पाडले आहे. जोपर्यंत कॉन्व्हेंट शाळेचे शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमानुसार सर्व सुविधा व वेतन लागू होत नाही तोपर्यंत मी स्वतः  त्यांचा मुद्दा सरकार दरबारी लावून धरेल. याकरिता आपण मला आपले  अमूल्य मत देऊन आपला प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेवर निवडून पाठवावे असे आवाहन नागो पुंडलिक गाणार यांनी कॉन्व्हेंट शिक्षकांना संबोधित करताना केले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कॉन्व्हेंट विभाग प्रमुख विवेक आंबेकर यांनी कॉन्व्हेंट शिक्षकांच्या समस्यांबाबत उपस्थितना अवगत केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष विनोद  पांढरे यांनी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षकांनी योग्य मतदान कसे करावे याबद्दल मतदारांना सांगितले. विद्यानिकेतन हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ राजेश्री गोहकर खमकर यांनी सर्व शिक्षकांना मतदान करण्याचे आवाहन केले व उपस्थितlचे  आभार व्यक्त केले. 
याप्रसंगी नागपूर शिक्षक मतदार संघाचे उमेदवार नागो गाणार, विद्या निकेतनच्या मुख्याध्यापिका सौ राजेश्री गोहकर खमकर,  परिषदेचे उपाध्यक्ष विनोद पांढरे, दिवाकर  पुद्धटवार, जिलानी सर व विवेक आंबेकर उपस्थित होते. विद्यानिकेतनच्या स्टेट, सीबीएससी व जुनिअर कॉलेज शिक्षक कर्मचारी या सभेला फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments