Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

नळाला टिल्लू पंप लावणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करा - रजनी झाडे

नळाला टिल्लू पंप लावणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करा - रजनी झाडे

मूल प्रतिनिधी

मूल शहरात सर्वांच्या घरी नळ कनेक्शन लावण्यात आले आहे. मात्र शहरातील काही श्रीमंत नागरिक आपल्याला मुबलक पाणी मिळावा म्हणून नळाला टिल्लू पंप लावले आहेत. टिल्लू पंप लावल्यामुळे त्यांच्या नळालाच मुबलक पाणीपुरवठा होतो. मात्र इतरांच्या नळाला होत नाही. त्यामुळे नळाला टिल्लू पंप लावलेल्या नागरिकांवर कार्यवाही करावी आणि इतर नागरिकांना न्याय द्यावा अशा मागणीची निवेदन मूल येथील महिला आघाडीच्या शिवसेना पदाधिकारी रजनी झाडे यांनी केली आहे.

मूल नगरपालिका सर्वांना सारखेच नळ टॅक्स घेतात, त्यामुळे पाणी सुद्धा सर्वांना सारख्याच प्रमाणात मिळायला पाहिजे. काही श्रीमंत नागरिक मुबलक पाहण्याकरिता आपल्या नळाला मोटर पंप लावल्यामुळे इतर सर्वसामान्य गरीब नागरिकांना त्याचा त्रास होत आहे, यावर आळा घालण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments