Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विज्ञान प्रदर्शनी उद्घाटन सोहळा आणि प्रश्न मंजुषा स्पर्धा संपन्न

विज्ञान प्रदर्शनी उद्घाटन सोहळा आणि प्रश्न मंजुषा स्पर्धा संपन्न

Science Exhibition Inauguration Ceremony and Question Manjusha Competition concluded

मूल प्रतिनिधी
 

माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स  येथे विज्ञान प्रदर्शनी आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन 20/01/2023 ला करण्यात आले. कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

कार्यक्रमासाठी पुनमचंद वाळके शिक्षक नवभारत विद्यालय मूल, अमित राऊत पत्रकार मूल लाईव्ह, प्रकाश चलाख पत्रकार नवराष्ट्र , रवी कावळे मुख्याध्यापक  , असपाक सय्यद अकॅडमीक इंचार्जे, रितेश चन्ने विद्यार्थी प्रतिनिधी , श्रावणी खोब्रागडे विद्यार्थिनी प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.


पुनमचंद वाळके यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्व पटवून दिले तर अमित राऊत यांनी विद्यार्थ्यांना व्यासपीठावर येऊन मत व्यक्त करायला व्यासपीठ मिळत असल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढत आहे असे मत व्यक्त केले. मुख्याध्यापक रवी कावळे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानात प्रगती करा आणि वेगवेगळे शोध लावून देशाचे आणि शाळेचे नाव उज्वल करा असे सांगितले. विद्यालयातील शिक्षक असपाक सय्यद आणि वामन कवाडकर यांनी विज्ञान स्पर्धेचे नियम सांगितले.


कार्यक्रमाचे परीक्षण पुनमचंद वाळके, असपाक सय्यद, सचिन वाढइ, निलेश गेडाम यांनी केले.  कार्यक्रमाचे संचालन शर्वरी बोमनवर, ओम राखडे यांनी केले. तर आभार प्रदशन भुपेंद्र मोटघरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments